जिल्हा परिषद नवीन इमारतीला 3वेळा मुदतवाढ मिळाली तरीही काम अर्धवटच:सभापती गरड यांनी कंत्राटदार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर
जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काम पूर्ण नसतानाही कंत्राटदाराला आतापर्यंत तब्बल ५९ पैकी ५७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय काळामध्ये कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यानेच कामाची गती मंदावली. कामाचा दर्जाही राखला गेला नसल्याचे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी…