सांगली-साताऱ्यात रंगणार तिरंगी रणसंग्राम:फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतर तानाजी पाटील बाहेर, शेवटच्या दिवशी मोठे ट्विस्ट
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून या मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्यात थेट सामना होणार आहे. त्यामुळे या…