Headlines

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया, चेतनला घेऊन पोलिस लोहगड किल्ल्यावर, हत्येच्या 'सीन रीक्रिएशन'साठी घटनास्थळी दाखल

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (28 जून) महत्त्वपूर्ण कारवाई केली. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोन्ही मुख्य आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. 18 जून रोजी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी ‘सीन रीक्रिएशन’ आयोजित केले आहे. केतनला कोणत्या…

Read More

वीज वितरण कंपनीवर काँग्रेसचा मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन‎

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक, विशेषतः महिला प्रचंड त्रस्त झाल्या आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या पुढाकाराने महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांचा कठोर बाणा लक्षात घेता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहरात…

Read More

रीलसाठी तोंडात ठेवला मेलेला साप:सोशल मीडिया लाइव्हमुळे हरवलेला कुत्रा सापडला; कोंबड्यांच्या बांग देण्याने परदेशी व्यक्ती त्रस्त

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने रील बनवण्यासाठी मृत साप तोंडात ठेवला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. तर, मेक्सिकोमध्ये वर्ल्ड कप सेलिब्रेशनच्या लाइव्हस्ट्रीममध्ये एका कुटुंबाला एक महिन्यानंतर त्यांचा हरवलेला कुत्रा सापडला. दुसरीकडे, थायलंडमध्ये कोंबड्यांच्या बांगेने त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने नगरपालिकेत तक्रार केली. दुबईतील एका महिलेने तिच्या लग्नाचे सोने विकून त्याऐवजी हर्मीसची लक्झरी हँडबॅग खरेदी करण्यास सुरुवात…

Read More

मेळाव्यात कौटुंबिक समस्या निवारण्यावर मंथन:पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्राच्या पुढाकाराने आयाेजन‎

पाटील समाज अकोला अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाटील समाज महिला मंडळ व कौटुंबिक समस्या समेट केंद्रातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. मोठ्या उमरी परिसरातील संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या यात मेळाव्यात कौटुंबिक समस्या न . मेळाव्यात अध्यक्षस्थानी उमरीचे माजी सरपंच तथा ओम साई बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बळीराम कपले होते. प्रमुख…

Read More

मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला:शहरात सायंकाळी दीड तास पाऊस बरसला‎

अकोला शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले. जोराच्या पावसासह विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची भंबेरी उडाली. पावसामुळे अकोला शहरातील वीज काही काळ गेली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. अकोला शहरात सायंकाळी पाचपासून साडेसहा वाजेपर्यंत सुमारे दीड तास पाऊस बरसला. त्यानंतर त्याने थोडी…

Read More

यंंदा वह्यांच्या किंमतीमध्ये 10% वाढ:शाळांमधून पुस्तके मिळत असल्याने नवीन पुस्तकांचा व्यवसाय ठप्प‎

जिल्हाभरातील शाळांची घंटा येत्या ३० जून रोजी वाजणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास पेटी, बूट, रेनकोट आणि छत्री यांसारख्या शालेय साहित्याने बाजारपेठ पूर्णपणे फुलली आहे. शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने अकोला शहरातील टिळक रोड, महात्मा गांधी चौक आणि चिवचिव बाजार…

Read More

लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:डॉ. उपेंद्र कोठीकर यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांची कार्यक्रमाला उपस्थिती‎

२५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. ज्यावेळी सत्तेसाठी देशातील जनतेच्या स्वातंत्र्याला बेड्या घातल्या गेल्या, तो भीषण कालखंड देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी वरूड – मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्तच्या विशेष स्मरण कार्यक्रमात ते बोलत…

Read More

अंबाड्यातून 1.39 लाखांचे ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त:विक्रीसाठी आणल्याचे आले समोर, एकावर गुन्हा‎

शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांची साठवणूक करून ती शेतकऱ्यांना अधिक दराने विक्री करणाऱ्या अंबाडा येथील एकावर कृषी विभाग आणि मोर्शी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ८६ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, सुमारे १ लाख ३९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई २६ जूनला सायंकाळी करण्यात आली. मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…

Read More

प्रवाशांची पळवापळवी:200 मीटर नियमाची ऐशी- तैशी; थेट बसस्थानकाजवळच खासगी वाहतूक

येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खासगी वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) दररोज मोठा आर्थिक फटका बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकारामागे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप आता प्रवासी आणि जागरुक संघटनांकडून केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते सकाळी…

Read More

चांदूर बाजारमधील रस्ता पूर्ण उखडला:विद्यार्थी, रुग्णांची गैरसोय, लोखंडी सळ्या निघाल्या‎

शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ५, प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अक्षरशः उखडलेल्या अवस्थेत आहे. या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. परिणामी वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. चांदूर बाजार-वलगाव मार्गावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जाणारा…

Read More