Headlines

वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण‎सुटल्याने कार एसटी बसला धडकली‎:वैजापूरच्या खंडाळा-कोल्ही शिवारात अपघात, कारमधील पाच जण जखमी‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा-कोल्ही शिवारात रविवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे येथून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने वैजापूरमार्गे जाणाऱ्या सिल्लोड-नाशिक बसला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून, दोन गंभीर आहे.सिल्लोड आगाराची बस (एमएच २० बीएल ३७७९) नाशिककडे जात होती. यावेळी वळणावर समोरून येणाऱ्या कारने (एमएच १२ एफके…

Read More

पाणीटंचाईला वैतागलेल्या शेतकऱ्याने‎मोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी‎:कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने हवालदिल झाले बागधारक‎

रब्बीच्या पेरणीला हातात पैसे नव्हते. पाऊस वेळेवर येईल म्हणून वाट पाहिली, पण त्याने दगा दिला. आणि जेव्हा आला, तेव्हा होत्याचे नव्हते करून गेला. निसर्गाच्या या लहरीपणाने एकाला हसवले तर दुसऱ्याला रडवले. गेल्या वर्षीच्या कापसाच्या भावाची कोंडी अजून फुटलेली नाही; उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न घटले. भूसार पिके हातची गेल्यावर मोसंबी तरी सुखाचे दिवस दाखवेल, या…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्याग, करारी बाणा अन् दूरदृष्टी अतुलनीय:मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवावा, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा करारी बाणा, त्याग, दूरदृष्टी आणि शौर्य हे अतुलनीय होते. मुघलांच्या काळात अनेक हिंदू मंदिरांची पडझड होत असताना त्यांनी देशभरातील मंदिरांचे जतन, पुनर्बांधणी आणि विकास करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच त्यांनी समाजकल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी तलावांची निर्मिती, पाणी व्यवस्थापन आणि लोककल्याणकारी कामांच्या माध्यमातून…

Read More

प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची टीका:म्हणाले- पक्षांतरासाठी विकासकामांचे ढोंग बंद करा; लखाणींच्या उमेदवारीवरही भाष्य

महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली असून आज अर्ज भरण्यात येणार आहे. यात विशेष लक्ष वेधले गेले ते म्हणजे भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखणी यांना उमेदवारी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया…

Read More

पैठणमध्ये शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन:शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने

पैठण | प्रतिनिधी राज्यात वाढती महागाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी दर तसेच पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी पैठण शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सारंग यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

Read More

वादळी पावसाचा तडाखा; झाडे, वीज खांब कोसळले:वीज खांब पडल्याच्या तसेच फ्लेक्स बोर्ड उडाल्याच्या घटना

प्रतिनिधी​|अहिल्यानग र ​अहिल्यानगर शहरात रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. जोरदार वारे आणि पावसाच्या सरींमुळे शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या, वीज खांब पडल्याच्या तसेच फ्लेक्स बोर्ड उडाल्याच्या घटना घडल्या. ​शहरात सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा होता. दिवसभर उन्हाचा चटका बसल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, रात्री अचानक वातावरणात…

Read More

वडिलांच्या संपत्तीपेक्षा संस्कारांचा वारसा जपा- साध्वी सोनालीदीदी:पाळधीला राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात भाविकांना आवाहन‎

प्रतिनिधी | पाळधी ‘माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा’ या अभंगातील ओळींचा संदर्भ देत साध्वी सोनाली दीदी करपे यांनी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा पार पाडली. वडिलोपार्जित संपत्तीसोबतच वडिलांनी दिलेले संस्कार, समाजसेवा आणि चांगल्या कार्याचा वारसाही पुढे नेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. युवतींना धर्म, संस्कार, कुटुंबाच्या प्रतिष्ठेप्रती निष्ठावान राहण्याचे आवाहन…

Read More

देशभरातील उष्णतेची लाट संपली, पावसामुळे तापमानात घट:जैसलमेरमध्ये वाळूचे वादळ; उत्तराखंडमधील चंपावतमध्ये नदीत अडकलेल्या 50 लोकांची सुटका

देशातील बहुतांश भागांमध्ये रविवारी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदवली गेली. भारतीय हवामान विभागाच्या मते, देशभरात उष्णतेची लाट (हीटवेव्ह) संपली आहे. अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळामुळे हवामानात बदल झाला आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी धुळीचे वादळ आले, ज्यामुळे तापमानात घट झाली. जैसलमेरमध्ये वाळूचे वादळ आले. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला, मात्र कोणत्याही प्रकारचे…

Read More

धनंजय देशमुखांविरोधातील तक्रार निघाली खोटी!:आमदार मुंडेंनी गोळीबार केल्याचाही दावा खोटा; बीडमध्ये रंगले खोट्या तक्रारींचे नाट्य

कधीही न घडलेल्या गुन्ह्यांचे दाखल झालेले गुन्हे अन् नंतर थेट आमदार धनंजय मुंडेंनी गोळीबार केल्याची तक्रार यामुळे रविवारचा दिवस चर्चेचा आणि बीड पोलिसांना तापदायक ठरला. दिवसभराच्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले गेले. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या पोलिस अंगरक्षकाची पिस्तूल काढून ती…

Read More

दैना:भावडी येथे रस्त्याच्या कामाची मुदत संपली, कोट्यवधींचा निधी असूनही रस्ता अपूर्णच; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कमालीची अनास्था, मजुरांवर उपासमारीची वेळ‎

प्रतिनिधी | फुलंब्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत प्रशासकीय स्तरावर किती अनास्था आहे, याचे ज्वलंत उदाहरण फुलंब्री तालुक्यातील भावडी येथे पाहायला मिळत आहे. या रस्त्याच्या कामाचा अधिकृत कालावधी संपून गेला असला, तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यातच आता पावसाळा अगदी तोंडावर आल्याने, या रस्त्याचे काम पूर्ण होणार कधी, असा…

Read More