Headlines

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी-गोपालनगर मार्गावरील सूतगिरणीजवळ उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांतच एका आरोपीला अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. मृत व्यक्तीचे नाव माणिकराव बळीरामजी बोरकर (६५, रा. गोदावरी कॉलनी,…

Read More

आषाढीच्या पूजेला येताय, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या:रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पंढरपूरला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी एकदा नाही तर दोन वेळा विचार केला पाहिजे, असा टोला लगावताना रोहित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, “आषाढीच्या पूजेला येताय आणि या पवित्र भूमीत दिलेला…

Read More

अचलपूरच्या दोनोडा शाळेत सहावी, सातवीचे वर्ग सुरु:सीईओंच्या स्पष्टोक्तीने विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश

अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून सहावी आणि सातवीचे वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या आंदोलनानंतर ही घोषणा केली. यामुळे अनेक वर्षांपासून बंद असलेल्या वर्गांमुळे होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. यापूर्वी दोनोडा शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग होते. मात्र, शाळेची इमारत जीर्ण झाल्याने…

Read More

कच्चे तेल 4 महिन्यांत पहिल्यांदाच $75 च्या खाली:अमेरिका-इराण करारानंतर 3.1% नी घसरून $74.73 वर, होर्मुझमधून 1.9 कोटी बॅरल तेल गेले

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या बातम्यांनंतर बुधवारी कच्च्या तेलाच्या किमती 3.1% नी घसरल्या. यामुळे मध्य पूर्वेतील युद्धानंतर प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली आली. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड फ्युचर्स 2.32 डॉलरच्या घसरणीसह प्रति बॅरल 74.76 डॉलरवर आले. तर, अमेरिकन क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट देखील 2.17 डॉलर (2.96%) नी घसरून प्रति बॅरल…

Read More

महाराष्ट्राने घरकुल बांधकामात रचला नवा इतिहास:एका वर्षात 6 लाखांहून अधिक घरे पूर्ण, पुढील वर्षात 15 लाख घरं बांधली जातील- जयकुमार गोरे

राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची माहिती दिली. जयकुमार गोरे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील आठ वर्षांत महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाकडून 10 लाख 26 हजार घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांमुळे…

Read More

अकरावी तिसऱ्या फेरी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस:जिल्ह्यात 31,367 जागा अजूनही रिक्त

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज, २५ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही ३१,३६७ जागा रिक्त असून, एकूण ४३,११० प्रवेश क्षमतेपैकी २० जूनपर्यंत केवळ ११,७४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी २० जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी…

Read More

Maharashtra Road Safety Top Priority

राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते विकासाबरोबरच रस्ते सुरक्षा हा प्रत्येक प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. राज्यातील अपघातप्रवण मार्गांवर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोज . रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले…

Read More

पु. ल. स्मृती महोत्सवाला पुण्यात सुरुवात:पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, पुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा

पुण्यात ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु. ल. परिवार’ यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय पु. ल. स्मृती महोत्सवाला बुधवार, २४ मे रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्‌घाटन तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पंडित तळवलकर यांनी पु. ल. देशपांडे यांना ‘अतिशय आनंददायी ऊर्जा’ असे संबोधले आणि कला क्षेत्रातील त्यांचे योगदान युवा पिढीला समजणे महत्त्वाचे…

Read More

सलमान खान साकारू शकतो कर्णाची भूमिका:अहवालात दावा- राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या पीरियड चित्रपटात दिसू शकतो अभिनेता

सलमान खान एका मोठ्या बजेटच्या पीरियड चित्रपटात दिसू शकतो. सलमान या चित्रपटात महाभारतातील प्रमुख पात्र कर्णाची भूमिका साकारताना दिसू शकतो. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा करणार आहेत, तर फरहान अख्तरची एक्सेल एंटरटेनमेंट याची निर्मिती करेल. रिपोर्टनुसार, सलमानने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आणि लगेच यासाठी होकार दिला. या भूमिकेसाठी…

Read More

जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय महाराजस्व अभियान:शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून देणार; पालकमंत्र्यांची घोषणा

अमरावती जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’ राबवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजून दिल्या जातील. हे अभियान पुढील महिन्यात २१ ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शेतजमिनीच्या रस्त्यांवरून, वहिवाटीवरून आणि पाणंद रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये अनेकदा वाद होतात. या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडे मागणी केली जाते,…

Read More