मराठी शाळा वाचवा अभियान 30 जूनपर्यंत:शिक्षण बचाव समन्वय समितीतर्फे जिल्ह्यात राबवले जाणार
राज्य शासनाच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या एकत्रीकरण आणि बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण बचाव समन्वय समितीने अमरावती जिल्ह्यात ‘मराठी शाळा वाचवा अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान २४ जूनपासून ३० जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबवले जाईल. समितीच्या मते, शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात आले आहे. या धोरणाचा सर्वाधिक फटका ग्रामीण, आदिवासी…