Headlines

अचलपूर तालुक्यातील वडुरावासीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन:घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रशासनाकडे तातडीने मागणी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या पांढरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वडुरा गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील घटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. निवेदनानुसार, संबंधित कुटुंबे आदिवासी आणि गरीब असून, गेल्या १५ वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्या झोपड्या…

Read More

Anjana Singh Files Complaint Against Khesari Lal Yadav in Lucknow

लखनऊ19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लखनऊमध्ये भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंहने अभिनेता खेसारी लाल यादव यांच्याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. अंजनाचा आरोप आहे की, सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या 11 वर्षांच्या मुलीचे AI द्वारे तयार केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले. त्याचबरोबर अश्लील भाषा वापरण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. अंजना सिंहने खेसारी…

Read More

पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सर्वपक्षीय एकजूट:तिवस्यात बाजारपेठ बंद, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

तिवसा येथे गुरुवारी सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी एकदिवसीय बंद पाळला. दिल्लीत पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि किरकोळ दुकाने बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद…

Read More

अमरावतीत तिसऱ्या दिवशीही 'नीट' गैरव्यवहाराविरोधात आंदोलन:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट रस्त्यावर

अमरावतीमध्ये ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही उमटले. शहरात विविध ठिकाणी धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या आठवड्यापासून विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केले…

Read More

नांदगावात डाव्या आघाडीची निदर्शने:दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला

नांदगाव खंडेश्वर येथे गुरुवार, २३ जुलै रोजी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डाव्या आघाडी व वंचित बहुजन आघाडीने निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान शहरात बंदही पाळण्यात आला. डावी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील बसस्थानक चौकात जोरदार निदर्शने केली. त्यांनी शहरातून मोर्चा काढत व्यापारी, दुकानदार, कामगार, शेतकरी तसेच सामान्य…

Read More

एडीसीसीच्या धोरणात्मक निर्णयावरील बंदीला हायकोर्टाची स्थगिती:विभागीय सहनिबंधकांकडून स्पष्टीकरण मागवले, कारवाईचा इशारा

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यावर घालण्यात आलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सत्ताधाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे पत्र विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी…

Read More

टर्मिन इंजेक्शनची अवैध विक्री:दोघे अटकेत; 100 बाटल्या जप्त, वाघोली पोलिसांची 'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत कारवाई

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटर्मिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून टर्मिन इंजेक्शनच्या १०० बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूरज पद्माकर भुत्ते (वय १९) आणि आकाश गणेश धनवटे (वय १९, दोघे रा. लोणीकंद) अशी…

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण:पीएम मोदींच्या निर्देशानुसार फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना; विरोधकांनी संसदेत चर्चा करावी – मोहोळ

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार नीटसह विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना केली जात आहे. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत असून, या गैरप्रकारातील एकाही दोषी व्यक्तीला सोडले जाणार…

Read More

हडपसरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय:तीन तरुणींची सुटका, मालकीण आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल

हडपसर पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी, स्पा मालकीण आश्र्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अबुल हुसेन यांच्यासह दोघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार बाबु लोणकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मगरपट्टा सिझन…

Read More

वारजे घरफोडीचा गुन्हा एका तासात उघड:सराईत चोरट्यास अटक, चोरीचा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वारजे माळवाडी पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा अवघ्या एका तासात उघडकीस आणत सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी वारजे येथील जनता नगर परिसरातील एका पीजीमध्ये ही घटना घडली. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात…

Read More