Headlines

'डबल द बस':संभाजीनगरच्या सक्षम सिटीबस सेवेसाठी नागरिकांच्या मतांचा कौल; ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचाचे विशेष अभियान

झपाट्याने विस्तारणाऱ्या आपल्या शहरात आज वाहतूक कोंडी, महागडा प्रवास आणि वाढते प्रदूषण या मोठ्या समस्या बनल्या आहेत. या सर्व समस्यांवर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे ‘सक्षम आणि सर्वसमावेशक शहर बस सेवा’. केंद्र सरकारच्या नियमानुसार शहरासाठी किमान 600 बसेसची गरज असताना, आज प्रत्यक्षात केवळ 100 बसेस उपलब्ध आहेत, ज्यातील अवघ्या 70 ते 80 बसेस रस्त्यावर धावतात. ही…

Read More

19 वर्षांनंतर कोलकात्यात परतल्यावर तस्लिमा म्हणाल्या-ही घरवापसी:आनंद आणि दुःख दोन्ही घेऊन परतले आहे, 1 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रम

निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन 19 वर्षांनंतर कोलकाता येथे परतल्या आहेत. त्या म्हणाल्या की, हे माझ्यासाठी माझ्या देशात परतण्यासारखे आहे. तस्लिमा 1 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात सहभागी होतील. यामध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि लेखक शीर्षेंदू मुखोपाध्याय यांच्याही सहभागी होण्याची शक्यता आहे. 2007 मध्ये शहर सोडावे लागले होते तस्लिमा 2007 नंतर प्रथमच कोलकाता येथे…

Read More

Chandrashekhar Bawankule Challenges Abhijeet Dipke Over BJP Threat Claims

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतल्यावर भाजपवर केलेल्या आरोपांना राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याने जर त्यांना . अभिजीत दीपकेंनी नाव सांगावं, आम्ही कारवाई करू अभिजीत दीपके यांनी भाजपवर केलेल्या आरोपांचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे…

Read More

Tanaji Sawant Slams Vashi Tehsildar Over Crop Insurance Controversy

खरीप पीक विमा 2025च्या भरपाईत झालेली प्रचंड तफावत आणि मतदारसंघातील महसूल मंडळे विम्यातून वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी थेट वाशीच्या तहसीलदारांना फोन करून चांगलेच फैलावर घ . तानाजी सावंत तहसीलदारांवर का संतापले? शेजारच्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत पीक विमा मंजूर झाला…

Read More

2 शिफ्टमध्ये काम अन् सुट्ट्याही रद्द!:तुकाराम मुंढेंविरोधात 29 कर्मचाऱ्यांनी थोपटले दंड; अपुऱ्या मनुष्यबळाचा दावा, थेट मंत्र्यांकडे केली तक्रार

अन्न भेसळविरोधी धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विभागातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची…

Read More

Hyundai Naira Electric MPV Concept Unveiled at GIIAS 2026

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी इंडोनेशियाई बाजारासाठी तयार करण्यात आली आहे. ही कार किया कॅरेन्स क्लेविस EV ची रिबॅज्ड आवृत्ती आहे, जी जुलै 2025 पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हुंडई आणि किया दोन्ही हुंडई मोटर ग्रुपचा…

Read More

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी रांगेत उभे असलेले दिसतात: 15 डॉलर (सुमारे 1,400 रुपये) किमतीची एक छोटीशी आईस्क्रीम. ही केवळ एका शहराची किंवा एका दुकानाची गोष्ट नाही. साथीच्या रोगादरम्यान छंद म्हणून सुरू झालेला हा आईस्क्रीम व्यवसाय आता…

Read More

एसबीआय म्युच्युअल फंडाची नवी योजना:'SBI निफ्टी मिडकॅप 150 मोमेंटम 50 ईटीएफ एफओएफ' लाँच

भारतातील सर्वात मोठी फंड हाऊस असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने ‘एसबीआय निफ्टी मिडकॅप 150 मोमेंटम 50 ईटीएफ एफओएफ’ या नव्या योजनेच्या लाँचची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड फंड ऑफ फंड (FoF) योजना असून, ती प्रामुख्याने ‘एसबीआय निफ्टी मिडकॅप 150 मोमेंटम 50 ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करेल. या योजनेचा न्यू फंड ऑफर (NFO) कालावधी 27 जुलै 2026 पासून…

Read More

संजय राऊतांना मानसिक शांती शिबिरात पाठवण्याची गरज:भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे म्हणाले- विरोधक चर्चेतून पळ काढतात

“संजय राऊत यांचे मानसिक स्वास्थ्य बऱ्याच दिवसांपासून बिघडले असून, त्यांना मानसिक शांततेसाठी एखाद्या शिबिरात किंवा विपश्यनेला पाठवण्याची खरी गरज आहे,” असा जोरदार हल्लाबोल भाजपचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संसदेत मांडले जाणारे नवे परीक्षा सुधारणा विधेयक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील विरोधकांचे आरोप…

Read More

पुण्यात चार गावठी पिस्तुले जप्त:विक्रीसाठी आणलेल्या शस्त्रांसह 23 वर्षीय तरुण अटकेत

पुणे शहरात खंडणीविरोधी पथक क्रमांक एकने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेली चार गावठी पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी २३ वर्षीय भूषण उत्तम मोहिते या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे शहरातील गोकुळनगर-नऱ्हे परिसरात करण्यात आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याची एकूण किंमत दोन लाख ६०० रुपये आहे. अटक…

Read More