Headlines

हिंगोलीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर मोठी कारवाई:22 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. हट्टा आणि औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत अवैध मुरूम आणि वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूण २२.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर मंगळवारी ता. 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण:77,300 वर व्यवहार सुरू, निफ्टीतही 100 अंकांची घसरण; ऑटो, बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

आज म्हणजेच 14 जुलै रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांच्या घसरणीसह 77,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण झाली असून, तो 24,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री दिसून येत आहे. कच्चे तेल 2% वाढून 85 डॉलरवर पोहोचले कच्च्या तेलाच्या किमतीही 2%…

Read More

रीलसाठी आजीचा स्कॉर्पिओवर स्टंट:सकाळी लग्न, संध्याकाळपर्यंत घटस्फोट; चालत्या रेल्वेत रुद्राभिषेक, रेल्वे म्हणाली- ₹3 लाख दिले

गुजरातमध्ये एका आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्या स्कॉर्पिओवर स्टंट करताना आणि रील बनवताना दिसत आहेत. तर, हिमाचल प्रदेशात एक असा विवाह झाला, ज्यात संध्याकाळपर्यंत घटस्फोटही झाला. दुसरीकडे, धावत्या ट्रेनमध्ये रुद्राभिषेकावर रेल्वेने सांगितले आहे की, यासाठी त्यांनी ₹3 लाख दिले होते. कर्नाटकात 10 महिन्यांच्या एका मुलाने अवघ्या 36 सेकंदात 21 पायऱ्या चढून नोबल बुक…

Read More

भावली धरणावर छेडछाड, कुटुंबावर हल्ला:कारचा पाठलाग करत लूटमार, लाकडी दांडे, लाेखंडी राॅडने कारच्या काचा फोडल्या

भावली डॅम आणि रिसॉर्ट परिसरात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची धिंडवडे काढणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिकरोड येथील एका कुटुंबावर स्थानिक गुंडांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला….

Read More

5 कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा वाढणार:पळसखेडे तलावातून काढला जाणार 50 हजार घनमीटर गाळ; जमीन हाेणार सुपीक‎

महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त शिवार व गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत पळसखेडे गाव तलावात सुरू असलेल्या गाळ काढणीच्या कामामुळे यंदा तलावात तब्बल ५ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जलसाठा वाढी . जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी तलावाला भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची गुणवत्ता आणि प्रगती…

Read More

उद्या भव्य मोर्चा:व्यावसायिक दुबैया हत्येप्रकरणी श्रीरामपूर सलग दुसऱ्या दिवशी 'कडकडीत' बंद

शनिवारी भरदुपारी झालेले हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद शहरासह संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर आणि परिसरात बेमुदत बंद पाळण्यात आला. व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक या गुन्हेगारीविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, मंगळवारी बाजारपेठेसह शहरातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. या हत्येचा तीव्र…

Read More

बंगालच्या उपसागरात 9 मच्छिमारांचे मृतदेह सापडले:शरीर कुजल्याने ओळख पटणे कठीण; 8 दिवसांपूर्वी उलटली होती बोट; 6 अजूनही बेपत्ता

पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगनाजवळ बंगालच्या उपसागरात बुडालेल्या एका ट्रॉलरमधून आठ दिवसांनंतर नऊ मच्छिमारांचे मृतदेह सापडले आहेत. सहा मच्छिमार अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ‘जय माँ काली’ नावाचा ट्रॉलर 2 जुलै रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील शंकरपूर मासेमारी बंदरातून 15 मच्छिमारांना घेऊन समुद्रात मासेमारीसाठी निघाला होता. 6 जुलै नंतर ट्रॉलरशी संपर्क तुटला होता. अधिकाऱ्याने…

Read More

एकात्मिक रोग व्यवस्थापनाने वाढणार कापसाचे उत्पादन:बऱ्हाणपुरात शेतकरी चर्चासत्र, कृषिकन्यांच्या शास्त्राधारित मार्गदर्शनाने शेतकरी समाधानी‎

सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बऱ्हाणपूर येथे शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रा. गणपत चव्हाण यांच्या वस्तीवरील प्रांगणात “कापूस पिकातील एकात्मिक कीड व र . या चर्चासत्रात कपाशीवरील कीड व रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढीसाठी शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला. कीटकशास्त्र विभागाचे प्रा. सोमनाथ…

Read More

सावळीविहीर कोंडीतून साईभक्तांची सुटका:गुरुपौर्णिमेपूर्वी महामार्गाची एक बाजू धावणार, अतिक्रमणे हटवण्यासाठी डाॅ. विखेंचा दोन दिवसांचा दुकानदारांना ‘अल्टिमेटम’‎

अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे रस्ता व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात कमी केली जाईल. यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवट . रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटविण्याचे आवाहन डॉ. विखे यांनी केले आहे. मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने मंदिरे,…

Read More

ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात:खासदार वाकचौरेंविरोधातील "ऑपरेशन तुडवा' आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले

शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुकारलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ आंदोलनावर तोफखाना पोलिसांनी सोमवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. खासदार वाकचौरे यांच्या दौऱ्यावेळी प्रत्यक्ष आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार वाकचौरे…

Read More