मराठवाडा जनविकास संघाकडून वारकऱ्यांसाठी 7 पाण्याचे टँकर रवाना:दशकपूर्तीनिमित्त 500 हून अधिक वृक्षरोपांचेही वाटप
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने यंदाही सात पिण्याच्या पाण्याचे टँकर रवाना केले आहेत. पिंपळे गुरव येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात संत-महंत आणि मान्यवरांच्या हस्ते या टँकरांचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत पाठवण्यात आले. या कार्यक्रमात दिंडी प्रमुखांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. तसेच,…