फुलेवाड्यातील पूजेवरून वाद:खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा, शरद पवार गटाची मागणी; पुरातत्व विभागाला पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महात्मा फुले यांच्या वाड्यात विनापरवानगी वटपौर्णिमा साजरी केल्याप्रकरणी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच, शनिवारवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती तसेच संविधान दिन यांसारखे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची…