Headlines

भातकुली पंचायत समितीला मिळणार दुसरे दालन‎:गळतीयुक्त इमारतीचा सीइओंनाही आला अनुभव, नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

भातकुली तालुक्यासाठीची अमरावतीत असलेली पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच आपला साज बदलणार आहे. या इमारतीचे बांधकाम फार जुने झाले असल्याने ती मोडकळीस आली आहे. सध्या गळकी इमारत म्हणून तिचा उल्लेख केला जात असून, पाणी गळण्याचा अनुभव सीईओ सत्यम गांधी यांनाही आला आहे. त्यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला अधिक गती आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

जंतरमंतरवरील आंदोलन संपले, स्वच्छता अभियान सुरू, 15 PHOTO:मंच – लाउडस्पीकर हटवले, आंदोलक परतले; बॅरिकेड्स रस्त्याच्या कडेला

नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात 20 जूनपासून जंतरमंतरवर सुरू असलेले धरणे प्रदर्शन शनिवारी संपले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आपले आंदोलन संपल्याची घोषणा केली. त्यानंतर जंतरमंतरवरून आंदोलक घरी परतले. येथे 36 दिवसांपासून लावलेला मंच काढण्यात आला. लाउडस्पीकर काढण्यात आले. त्यानंतर धरणेस्थळी राहिलेला कचरा एनडीएमसी आणि विद्यार्थ्यांनी साफ केला….

Read More

स्मार्ट कार्डमुळे एसटीची सेवा अधिक सुरक्षित, जलद, सुखकर होण्यास मदत:आमदार खोडकेंचे प्रतिपादन, आदिवासी कॉलनीतील एनसीएमसी शिबिराला प्रतिसाद‎

केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होत आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना रोख रकमेविना तिकीट व्यवहार करता येणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. येथील काँग्रेसनगर रोडवरील आदिवासी कॉलनी स्थित वीरांगणा दुर्गावती सभागृहात एसटी महामंडळाच्या…

Read More

अवैध सावकारीला कंटाळून 45 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या:मृत्युपुर्व चिठ्ठीत शेत हडपल्याचा आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा‎

अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २५ जुलैला सकाळी आठ वाजता उघडकीस आली. तरोडा (डोमक) येथे ही घटना उघडकीस आली आहे. पवन विश्वासराव भाकरे (४५, रा. तरोडा डोमक) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. भाकरे यांनी…

Read More

कौंडण्यपुरात दर्शनासाठी 4 तास प्रतीक्षा‎:विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 20 हजारांहून अधिक भाविक रांगेत‎

अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी चिंब भिजवत होत्या, तर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने कौंडण्यपूरचे वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले होते. पावसाच्या प्रत्येक थेंबात जणू पांडुरंगाच्या कृपेची अनुभूती होती आणि प्रत्येक भाविकाच्या हृदयात विठू-रखुमाईच्या दर्शनाची अखंड तळमळ दाटून आली होती. सुमारे चार तासांची दर्शन प्रतीक्षासुद्धा भक्तीच्या ओढीपुढे कमी वाटत होती. विठूनामाचा अखंड जयघोष, ओठांवरील अभंग आणि डोळ्यांत दाटलेली दर्शनाची…

Read More

पेपरफुटी आंदोलनाला 4 चेहऱ्यांनी क्रांतीत बदलले:दीपकेंनी डिजिटल पाठिंबा मिळवला; वांगचुक यांच्या उपोषणाने गर्दी गोळा केली

मे महिन्यात सरन्यायाधीश सूर्यकांत यांची ‘झुरळ’ वाली टिप्पणी व्हायरल झाली. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘झुरळ म्हणवून हिणवण्यात येणारे तरुण एकत्र आले तर काय होईल?’ काही दिवसांत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) स्थापन केली. त्यांच्या इंस्टाग्रामवर २.१ कोटी फॉलोअर्स झाले. नीट पेपरफुटीचा मुद्दा बनवून CJP ने रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली. सरन्यायाधीशांची टिप्पणी,…

Read More

विद्यार्थ्यांनी दोनशे रोपटे लावण्याचा केला निर्धार:श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये घेतला उपक्रम‎

दैनिक दिव्य मराठीच्या आवाहनाला प्रतिसाद देत बेलपुरा येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूल, स्टेशन ब्रांचच्या विद्यार्थ्यांनी एकूण २०० झाडांचे रोपटे लावण्यासह त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार केला. आज आषाढी एकादशीच्या पर्वावर शनिवार २५ रोजी पहिल्या टप्प्यात २५ रोपट्यांची लागवड केली. मुख्याध्यापक संदीप इंगोले यांच्या नेतृत्वात ही वृक्ष लागवड करण्यात आली. दिव्य मराठीने (दैनिक भास्कर समुह) देशभरात ७५…

Read More

जिल्हा काँग्रेसची इर्विन चौकात निदर्शने:शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले सादर‎

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने शनिवारी, २५ जुलैला निदर्शने केलीू . इर्विन चौक स्थित डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलन केले. केंद्र शासनाविरुद्ध प्रदर्शन करतानाच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी यावेळी केली . आंदोलनाच्या शेवटी शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून परीक्षा व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशा मागणीचे निवेदन…

Read More

भगवानगडावर भाविकांसाठी शंभर क्विंटल साबुदाणा फराळ:धाकट्या अलंकापुरीत आषाढीला भक्तीचा महासागर, भाविकांची गर्दी

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त धाकटी अलंकापुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र भगवानगडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि संत भगवानबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर हरिनाम, भजन, कीर्तन आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण गड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या वारकऱ्यांसाठी भगवानगड हे श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते….

Read More

बालदिंडीतून शिक्षण, पर्यावरण संवर्धनाचा संदेश:सटवायवाडी जि.प. शाळेचा उपक्रम, वारकरी वेशभूषेत चिमुकल्यांचा हरिनामाचा गजर‎

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारा बालदिंडी सोहळा कर्जत तालुक्यातील सटवायवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या बालदिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि पर्यावरण’ संवर्धनाचा संदेश दिला. दिंडी सोहळ्यात शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक टाळ-मृदंगाचा गजर, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण सटवायवाडी परिसर भक्तिरसात…

Read More