आषाढी हा सामाजिक ऐक्य, सेवा, समतेचा संदेश देणारा सण- महापौर:माळीवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विठू नामाने दुमदुमला
आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, सेवा व समतेचा संदेश देणारा सण आहे. संत सावता माळी, संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांची शिकवण आपल्याला परिश्रम व समाजसेवेची प्रेरणा देते. महापालिकेच्या वतीने शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे जतन केले जाईल, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा…