![]()
नेवासे तालुक्यातील वाकडी परिसरात पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला. बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक व विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ४ लाख ७८ हजार ६० रुपयांचा तब्बल ४७.८२८ किलो गांजा जप्त केला आहे. २४ जुलैच्या रात्री ११.५० ते २५ जुलैच्या पहाटे १.५० च्या सुमारास वाकडी शिवारात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यानुसार शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या उपस्थितीत पोलिसांनी महादेव पंडित जवदे याच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. पाहणीदरम्यान पिवळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या अशा ३ गोण्यांमध्ये गांजा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी महादेव पंडित जवदे (वय ३८) आणि शुभम बाबासाहेब काळे (वय २९, दोघे रा. वाकडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांना जागीच ताब्यात घेतले. आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक व विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस अंमलदार शहाजी आंधळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मध्यरात्री कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुढील तपास पो.नि. प्रताप दराडे करत आहेत. कारवाईचे महत्त्वाचे मुद्दे { जप्त मुद्देमाल: ३ गोण्यांमधून ४७.८२८ किलो गांजा (किंमत ४,७८,०६०). { अटक आरोपी : महादेव जवदे (३८) व शुभम काळे (२९). { दाखल गुन्हा: नेवासा पोलीस ठाण्यात
Source link
नेवाशात पोलिसांची मध्यरात्री कारवाई; 48 किलो गांजा जप्त, वाकडी शिवारातील शेडवर छापा; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा