प्रशांत भूषण म्हणाले- AI मुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला मर्यादा:मानवी कुतूहल, तार्किकता जपण्याचे आवाहन; दाभोलकर स्मृती व्याख्यान
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने प्रगतीमुळे मानवी जीवनात क्रांती होत असली तरी, कुतूहल, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किकता या मानवी मूल्यांचे महत्त्व भविष्यात अनन्यसाधारण राहील. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित वार्षिक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. भूषण यांनी स्पष्ट केले की, या तंत्रज्ञानावर संशोधन…