अमरावतीत 24 तासांत महसूल विभागाची मोठी कारवाई:एक तलाठी बडतर्फ, दुसरा निलंबित; तिसरा रडारवर
अमरावती जिल्ह्याचे महसूल प्रशासन सध्या कर्तव्यकठोर भूमिकेत आले आहे. गेल्या २४ तासांत एका महिला तलाठ्याला (ग्राम महसूल अधिकारी) बडतर्फ करण्यात आले असून, दुसऱ्या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. तिसरा तलाठीही रडारवर असून, याबाबत एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे. बडतर्फी आणि निलंबनाचे हे दोन्ही आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बजावले आहेत. बडतर्फ…