दिव्य मराठी ब्रेकिंग:सॉफ्टवेअर विक्रीतून कोट्यवधी कमावल्याचा सीएचा दावाही बोगस, उदगीर येथे सलग तिसऱ्या दिवशीही शोधमोहीम
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) अन्वेषण शाखेने एका बड्या सनदी लेखापालाच्या (सीए) कार्यालयासह निवासस्थाने व संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५०० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. ही शोधमोहीम तिसऱ्या दिवशी सुरू असून अजून दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सीएने ज्या कंपन्यांचे व्यवहार…