Headlines

सोने ₹1,703 ने वाढून ₹1.54 लाख तोळा:या महिन्यात ₹11 हजारने महाग झाले, चांदी आज ₹2,531 ने वाढून ₹2.36 लाख प्रति किलो

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,७०३ रुपयांनी वाढून १.५४ लाख रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीची किंमत २,५३१ रुपयांनी वाढून २.३६ लाख रुपयांवर पोहोचली आहे. या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये केवळ १७ दिवसांत सोने ११ हजार आणि चांदी…

Read More

अखेर पालकमंत्रिपदे जाहीर:रायगडची धुरा भरत गोगावलेंकडे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांची वर्णी; महायुतीतील 'पॉवर गेम'चा तिढा सुटला

राज्यात महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेला आणि मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठेचा बनलेला रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक महिन्यांच्या राजकीय रस्सीखेचीनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांची, तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची अधिकृत वर्णी लागली आहे. महायुतीतील पॉवर गेमच्या पार्श्वभूमीवर घेतलेला…

Read More

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा दिमाखात पारितोषिक वितरण सोहळा:गिरीश महाजनांनी दिला ‘सुराज्या’चा मंत्र

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ‘स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,’ असे मत व्यक्त केले. गणेशोत्सव साजरा करताना लाऊडस्पीकरचे…

Read More

सरकारचे सल्लागार म्हणाले- E20 इंधनामुळे गाड्यांचे नुकसान:E10 पेट्रोल पुन्हा सुरू करा; इंधनात 30% इथेनॉल मिसळल्यास अन्नसंकट शक्य

सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन (CEA) यांचे म्हणणे आहे की, E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान होत आहे. जुन्या दुचाकींसाठी E10 पेट्रोलची विक्री पुन्हा सुरू केली पाहिजे. नागेश्वरन यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखात म्हटले आहे की, भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट वेळेपूर्वीच साध्य करून कच्च्या तेलाच्या आयातीवरील अब्जावधी रुपये वाचवले, पण आता एक…

Read More

तारापूर एमआयडीसी पुन्हा हादरली!:विराज प्रोफाइल्स कंपनीत सलग 3 स्फोट; 3 कामगार जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक सुरक्षेचा बोजवारा पुन्हा एकदा समोर आला आहे. येथील ‘विराज प्रोफाइल्स’ या नामांकित स्टील कंपनीत आज (सोमवारी) सकाळी एकापाठोपाठ एक असे तीन भीषण स्फोट झाले. या लागोपाठ झालेल्या धमाक्यांमुळे संपूर्ण बोईसर परिसर हादरून गेला असून, कामगारांसह स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीमध्ये शंभर ते दीडशे कामगार काम करत होते….

Read More

गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे:नाना पटोलेंचा भाजप-आरएसएसवर घणाघात

गांधी परिवारावर होत असलेल्या टीकेवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गांधी परिवाराच्या देशासाठीच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून टीका करणे योग्य नाही, असे म्हणत पटोले यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे थेट सूर्यावर थुंकण्यासारखे आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. “स्वातंत्र्यलढ्यात तुमचा सहभाग काय?”…

Read More

Chaos Erupts Amid Barricading in Front of Harsiddhi and Bade Ganesh Temples

Marathi News National 13 Injured During Darshan At Nagchandreshwar Temple, One Critical: Chaos Erupts Amid Barricading In Front Of Harsiddhi And Bade Ganesh Temples उज्जैन13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आणि वर्षातून एकदा उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी उज्जैनमध्ये प्रचंड गर्दी उसळली. याच दरम्यान हरसिद्धी मंदिरासमोर बॅरिकेडिंग केलेल्या परिसरात गर्दीचा दाब वाढल्याने अनेक भाविकांची तब्येत…

Read More

‘विकसित भारत’ जिल्हास्तरीय पंच संमेलनाकडे लोकप्रतिनिधींची पाठ:केवळ पाच सरपंच उपस्थित, प्रशासनाची फजिती

विकसीत भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियानांतर्गत हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पंच संमेलनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असून जिल्हयातील ५६३ पैकी केवळ पाच ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित राहिल्याने प्रशासन चांगलेच तोंडघाशी पडले. अखेर कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसवून वेळ मारून नेण्यात आली. या प्रकारामुळे जिल्हा परिषद पंचायत विभाग व हमी योजनेचा कारभार चर्चेत आला आहे. केंद्र…

Read More

रस्त्याची दुरवस्था दाखवणाऱ्या रायगडच्या शाळकरी मुली थेट राज ठाकरेंच्या भेटीला:व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासन जागं, तात्पुरता रस्ता तयार

गावातील रस्त्याची दुरवस्था दाखवण्यासाठी शाळकरी मुलींनी तयार केलेला एक साधा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो राज्यभरात व्हायरल झाला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. या धाडसी विद्यार्थिनींच्या प्रयत्नाचे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील या तीन विद्यार्थिनींनी…

Read More

पुण्यात सदनिकेचे कुलूप तोडून 8 लाखांची चोरी:आंबेगाव बुद्रुकसह 3 ठिकाणी घरफोडी, एकूण 9 लाखांहून अधिक ऐवज लंपास

पुणे शहरात घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. आंबेगाव बुद्रुक येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. याशिवाय, सिंहगड रस्ता परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ३८ हजार रुपयांचे दागिने, तर येरवड्यातील एका किराणा दुकानातून ३५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल…

Read More