Headlines

CJI म्हणाले-गंभीर प्रकरणांत न्यायपालिका संसदेची वाट पाहत नाही:डिजिटल अरेस्टची स्वतःहून दखल; केंद्राला कठोर कायदे बनवण्याचे निर्देश

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, भारतीय न्यायव्यवस्था ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या नवीन प्रकारच्या फसवणुकीवर संसदेने कायदा बनवण्याची वाट पाहण्याऐवजी सक्रियपणे कारवाई करते. शनिवारी लंडनमध्ये 43व्या आंतरराष्ट्रीय सिम्पोजियम ऑन इकॉनॉमिक क्राईमच्या समारोप समारंभात त्यांनी हे सांगितले. सरन्यायाधीश म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्याची स्वतःहून दखल घेतली आहे. यात ठग व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला पोलीस अधिकारी,…

Read More

सुप्रीम कोर्ट अमित शहांच्या खिशात आहे का?:मी आहे ना, सर्व सेट होईल; अमित शहा-एकनाथ शिंदेंच्या कथित संवादावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मोहन भागवत जी विधाने अमेरिकेत करत आहे ती विधाने भारतात आल्यावर केली पाहिजे. नागपूर आणि दिल्लीमध्ये असे विधाने त्यांनी केली पाहिजे. संघाने भारतात एक आणि बाहेर देशात एक अशी भूमिका घेऊ नये, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांनी काय सुनेत्रा पवार यांच्या हाताखाली काम करायचे…

Read More

एफडीए, सरकारी लॅबचाच निकृष्टतेचा रिपोर्ट:पण ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी एकाच औषधीवर बंदी, औषधांच्या 46 बॅचेस निकृष्ट, तरीही‘हिंदुस्तान’लाच 21 कोटींचे कंत्राट

राज्यातील सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या गरीब रुग्ण, गरोदर माता आणि कुपोषित बालकांना हिंदुस्तान लॅबोरेटरीज लिमिटेडकडून निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कंपनीने पुरवलेल्या आयर्न फॉलिक ॲसिड सिरपच्या 103 पैकी तब्बल 46 बॅचेस प्रयोगशाळा चाचणीत निकृष्ट व अप्रामाणित आढळल्या आहेत. सरकारी प्रयोगशाळेनेही यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी आरोग्य विभागाने त्याच…

Read More

‘सोनं-चांदी सगळं घ्या, पण लेकराला सोडून द्या…’:‘समृद्धी’वर दरोडेखोरांनी 19 महिन्यांच्या बाळाला टाकले रस्त्यावर

‘तुला जे हवं ते घे, सोनं घे, पैसे घे, पण माझ्या लेकराला हात लावू नकोस…,’ समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांसमोर आई विनवणी करत होती… दरोडेखोरांना मात्र पाझर फुटला नाही. त्यांनी त्या कोवळ्या जीवाला थेट सिमेंटच्या रस्त्यावर फेकून दिलं अन् आईनं जिवाच्या आकांतानं गाडीबाहेर झेप घेतली. रडणाऱ्या बाळाला छातीशी कवटाळलं… समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ अंधाऱ्या रात्री दरोडेखोरांनी…

Read More

शाळेमध्ये पाऊल ठेवताच सुरू झाला प्रश्नांचा भडीमार:आ. पाचपुते यांचा जि. प. शाळांचा अनपेक्षित भेटींचा दौरा‎

शाळांची परिस्थिती कागदावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वर्गात जाऊन जाणून घेण्याचा उपक्रम आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सुरू केला आहे. श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना त्यांनी अचानक भेटी देत शैक्षणिक वातावरण, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींची पाहणी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नारायण आश्रम येथे भेटीदरम्यान पाचपुते यांनी शिक्षकांशी चर्चा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शाळेत…

Read More

नागपुरात पहाटेचा थरार:भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, चालकाने मद्यपान केल्याचा संशय

नागपुरातील जपानी गार्डन रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास सनोडिया असे या अपघातात प्राण गमावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास 3 गाड्या अत्यंत वेगाने एकमेकांशी शर्यत लावत जात असल्याचा संशय आहे. या शर्यतीदरम्यान एका भरधाव…

Read More

पै-पै जोडली, संकल्प केला अन् दिली 101 पोती साखर:गरीब शेतकऱ्याचा भक्तिभाव; वर्गणी न मागता पूर्ण केला अनेक वर्षांपूर्वीचा संकल्प‎

सप्ताह म्हटले की वर्गणी आणि देणगी गोळा करण्याची लगबग सुरू होते. मात्र, धनगरवाडी येथील ६० वर्षीय गरीब शेतकरी केरू विठ्ठल रकटे यांनी कोणाकडेही वर्गणी न मागता आपल्या कष्टाच्या कमाईतून तब्बल १०१ पोती साखर दान करून अनोखा भक्तिभाव जपला. योगीराज सद्गुरू गंग . साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही त्यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेला संकल्प पूर्ण केला….

Read More

व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी मर्यादा:"अशोक'वर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, परिस्थिती पूर्वपदावर आणू- मुरकुटे‎

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी स्थापन केलेल्या अशोक सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लागू केले आहेत. २८ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय बँकेला नवीन कर्ज किंवा आगाऊ रक्कम मंजूर अथवा नूतनीकरण करता येणार नाही. नवीन गुंतवणूक, निधी उभारणी, नवीन ठेवी स्वीकारणे तसेच काही प्रकारची देणी किंवा दायित्वे स्वीकारण्यावरही निर्बंध…

Read More

पाऊस नाही म्हणून पीक सोडू नका!:जमिनीत ओलावा टिकवण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहन‎

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाने अचानक ओढ दिल्याने खरीप पिकांवर ताण निर्माण झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पाण्याचे नियोजन, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि किडी-रोगांचे वेळीच व्यवस्थापन केल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल. ‘‘पाऊस नाही म्हणून पीक सोडू नका; उपलब्ध ओलावा जपा आणि पिकाला ताणातून बाहेर काढा, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथील वरिष्ठ…

Read More

क्रीडा महोत्सव:मैदानी खेळांतून जीवनात शिस्त आणि व्यक्तिमत्वाचा विकास, हॉकी, मल्लखांब ते तलवारबाजी.. प्रात्याक्षिकांनी वेधले लक्ष‎

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रोफेसर कॉलनी चौक विविध क्रीडा प्रकारांच्या प्रात्यक्षिकांनी अक्षरशः गजबजून गेला. हॉकी, सायकल, मल्लखांब, रायफल शूटिंग, तलवारबाजी, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग, खो-खो आणि बास्केटबॉल अशा विविध खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. खेळातून आरोग्य, शिस्त आणि जिद्द निर्माण होते, असा संदेश देत या उपक्रमातून शहरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे आवाहन करण्यात आले. खेळामुळे…

Read More