केंद्रीय शिक्षणमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांची चर्चा:देशातील तरुण पिढी आणि जेन-झी त्यांना स्वीकारणार नाही- पृथ्वीराज चव्हाण
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर देशाचे नवे शिक्षणमंत्री कोण होणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून, या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाचारण केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी, आजची तरुण पिढी (जेन-झी) आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून त्यांना या पदावर कोणत्याही परिस्थितीत…