तिबेटमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 37 भाविक सुखरूप:सागा येथून काठमांडूकडे परतीचा प्रवास सुरू; प्रशासकीय पातळीवरील वेगवान हालचालींमुळे यात्रेकरूंना दिलासा
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात असलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिबेटमधील सागा येथे अडकलेले हे सर्व भाविक आता सुखरूप काठमांडूकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केलेल्या पुढाकारामुळे आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्यामुळे या भाविकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला. सागा येथे अडकले होते भाविक ठाणे, पुणे,…