Headlines

समन्वयातून श्रद्धा व परंपरांचा आदर करावा:सटाण्यात शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांना पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांचे आवाहन‎

सण-उत्सव हे सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढविण्याचे माध्यम असून, सर्व धर्मियांनी परस्पर समन्वयातून एकमेकांच्या श्रद्धा व परंपरांचा आदर जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांनी केले. . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस दल व सटाणा पोलिस ठाण्याच्या वतीने राधाई मंगल कार्यालयात शांतता समितीची…

Read Full News

आज देशभरातील बँकांचा संप:बँक कर्मचारी '5-डे वर्किंग'च्या मागणीवर ठाम, शनिवार – रविवारच्या सुट्टीमुळे 3 दिवस बंद राहतील

एसबीआय, पीएनबी आणि युनियन बँक यासह देशभरातील सरकारी आणि काही खाजगी बँका आजपासून सलग तीन दिवस बंद राहतील. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 2 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या5-डे वर्किंगच्या मागणीसाठी शुक्रवारी एक दिवसाच्या संपाची घोषणा केली आहे. त्यानंतर, 12 सप्टेंबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आणि 13 सप्टेंबर रोजी रविवार असल्यामुळे बँक शाखा बंद राहतील. सरकार आणि…

Read Full News

जळगाव सपकाळ येथील उपोषण लेखी आश्वासनानंतर घेतले मागे

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी, सुरक्षित रस्ता द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू केलेले उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. स्मशानभूमीकडे योग्य, सुरक्षित रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून गैरसोय होत आहे. ८ सप्टेंबर रोजी एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीवेळी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदी, अडथळ्यांचा मार्ग पार करावा लागला. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना…

Read Full News

Increasing exports from India will reduce trade deficit

Marathi News National Agenda For Talks With China: Increasing Exports From India Will Reduce Trade Deficit मुकेश कौशिक11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जिनपिंग ७ वर्षांनंतर भारतात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची बैठकही होईल. २०२० चा गलवान संघर्ष व एलएसीवरील ४ वर्षे चाललेल्या तणावानंतर प्रथमच दोन्ही नेते भारतात बसून संबंधांची नवी जमीन निश्चित करतील. दोन्ही देश…

Read Full News

एमपीएससी 2025 परीक्षापेपरची फेरतपासणी- सीएम:विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉन बैठकीनंतर निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहाराविरुद्ध राज्यभरात पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले. एमपीएससीच्या २०२५च्या परीक्षेतील केवळ गुणांची फेरबेरीज न करता संपूर्ण उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होईल. वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरपत्रिका माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) उपलब्ध करून दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ‘वर्षा’ बंगल्यावर विद्यार्थी संघटना प्रतिनिधींसोबत सलग पावणेदोन तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले…

Read Full News

शालार्थ आयडी घाेटाळा:संभाजीनगरात 10 हजार फायलींची तपासणी सुरू, एसआयटीच्या पथकाकडून 5 जिल्ह्यांतील फायलींची झडती

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाच्या कामाला वेग आला आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर विभागात गुरुवारपासून संचिकांची (फाइल्स) कडक तपासणी सुरू झाली आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक शहरात दाखल झाले आहे. या पथकाने मीपाच्या (महाराष्ट्र…

Read Full News

There should be safety measures for children on social media, Supreme Court notice to the Center

Marathi News National There Should Be Safety Measures For Children On Social Media, Supreme Court Notice To The Center नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुलांपर्यंत लैंगिक तसेच वयाला अयोग्य असलेला आशय पोहोचणे, ऑनलाइन भूलथापा देऊन त्यांना शोषणाच्या जाळ्यात अडकवणे आणि सायबर छळाच्या वाढत्या धोक्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘भारतातील मुलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी…

Read Full News

मुंबईतील शाळेत डब्यात बटाटा, कांदा-लसूण आणण्यास मनाई:पालक वर्गासह राजकीय वर्तुळातून तीव्र संताप

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या मीरा रोड येथील ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेने विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यावरून काढलेल्या एका फतव्यामुळे नवा राजकीय वाद पेटला आहे. जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या नावाखाली शाळेने विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट आणण्यावर थेट बंदी घातली आहे. सत्ताधारी भाजप आमदाराच्याच शाळेत खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याने पालक वर्गासह राजकीय वर्तुळातून…

Read Full News

नागपुरात कर्जफेडीसाठी सावकारालाआईनेच पाठवले मुलीचे अश्लील फोटो:अवघ्या 10 हजारांच्या कर्जासाठी कुकृत्य; आई -सावकारावर गुन्हा

अवघ्या १० हजार रुपयांचे कर्ज न फेडल्याने एका आईनेच आपल्या १८ वर्षांच्या मुलीचे नकळत अश्लील फोटो व व्हिडिओ काढून सावकाराला पाठवले. आईच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना नागपुरात घडली. पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल् . याप्रकरणी आई आणि सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमामवाडा परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय…

Read Full News

जालन्यात 5,027 कुणबी नोंदी; 18,276 अर्ज मंजूर!:जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘नोंद सापडली म्हणजे थेट प्रमाणपत्र नाही’

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असताना, जिल्हा प्रशासनाने मागील तीन वर्षांत कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी केलेल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात अभिलेख तपासणीत 5,027 कुणबी नोंदी आढळल्या असून, या नोंदींच्या आधारे प्राप्त झालेल्या 18,276 अर्जांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. आशिमा मित्तल यांनी दिली. जिल्हाधिकारी म्हणाल्या…

Read Full News