जिल्हाधिकाऱ्यांनी जाचक अटी रद्द करून पीककर्ज वाटपाचे दिले निर्देश:अमरावती जिल्हा बँकेच्या मनमानीवर ताशेरे; 1 एप्रिल 2026 च्या परिपत्रकानुसार कर्जवाटपाचे आदेश
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नवीन खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप करताना टाळाटाळ आणि जाचक अटी लावल्या जात होत्या. यावर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बँकेने लागू केलेल्या अटी आणि दरकपात अयोग्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यांनी बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना…