Headlines

कात्रज-कोंढवा रस्त्यावर शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर:महासभेत विरोधक आक्रमक, प्रशासनाला धारेवर धरले; 'आणखी किती बळी घेणार?' असा सवाल

कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि आंदोलन केले. त्यांनी ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, दोषी प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे,’ अशी मागणी…

Read Full News

पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल सेवेसाठी सज्ज:फक्त एक परवानगी बाकी; प्रवासी हाताळणी क्षमता तासाला 405 ने वाढणार

पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी कमी करण्यासाठी हे काम करण्यात आले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. आता फक्त नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाची (बीसीएएस) अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. मोहोळ यांनी नूतनीकरण…

Read Full News

गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांना प्रवेशबंदी:12 ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत, गणपती विसर्जन होईपर्यंत, 24 तास लागू राहील

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. नागरिकांची मोठी गर्दी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी 12 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत, म्हणजे गणपती विसर्जन होईपर्यंत, दररोज 24 तास लागू राहील. गणेशोत्सवात मध्यवर्ती रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीतून जड वाहने…

Read Full News

एमपीएससी वाचवायची असेल तर अध्यक्ष बदला: रोहित पवार:विवेक भीमनवारांचा राजीनामा घेऊन तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करा, अन्यथा 16 सप्टेंबरपासून आंदोलन

आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी मागणी केली की, जर एमपीएससी वाचवायची असेल तर आयोगाचा अध्यक्ष बदलला पाहिजे. त्यांनी विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. अन्यथा, १६ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. एमपीएससी संयुक्त गट-क परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याची शक्यताही…

Read Full News

मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः साकारला शाडू मातीचा बाप्पा:‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ हजारो मुलांचा सहभाग, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळेत’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली. लहान मुलांसोबत सहभागी होत मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. या उपक्रमातून हरित, स्वच्छ आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. हजारो मुलांचा विक्रमी…

Read Full News

शिवराज मोरेंवरील हल्ल्याप्रकरणी वडेट्टीवारांचे फडणवीसांना पत्र:निष्पक्ष चौकशीसह कठोर कारवाईची मागणी

नागपूर येथे 9 सप्टेंबर रोजी आंदोलनादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांची भेट…

Read Full News

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार?:अजय बारसकरांची थेट ED कडे तक्रार; आरक्षणाच्या नावाखाली 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आधीच राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना, आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात थेट अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’कडे (ED) तक्रार दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली जरांगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी वाळू तस्करीसारखे काळे धंदे करून…

Read Full News

बारसगावात अंबादास दानवेंच्या हस्ते बैलपोळा:पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता, म्हणाले – प्रार्थनेशिवाय पर्याय नाही

अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे पारंपरिक उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. शिवसेना नेते, आमदार तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैलांचे पूजन करून शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सन्मान केला. शेतकऱ्याच्या कष्टात खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत दानवे यांनी बळीराजाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट येऊ दे, अशी…

Read Full News

नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला 82 पूर्ण:जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे अभिवादन

डॉ. नागनाथ अण्णांनी सातारा जेलच्या तटाहून टाकलेल्या उडीची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी, असे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी स्मारक समितीचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी केले. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला ८२ पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या स्मृती स्तंभाला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी कारागृह अधीक्षक…

Read Full News

कर्नाटकात वंदे मातरमची दोनच कडवी गायली जातील:राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या उपस्थितीतील कार्यक्रम अपवाद; काँग्रेसनेही दोनच कडवी निश्चित केली होती

कर्नाटक सरकारने गुरुवारी सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे फक्त पहिले 2 कडवे गाण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश राज्यात होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना लागू होईल. परंतु, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना यातून वगळण्यात आले आहे. याच वर्षी 9 जुलै रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्देश दिले होते की, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ सोबत…

Read Full News