Headlines

कारची काच फोडून पैसे लांबवणारी मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश:2.75 लाख रुपये जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

​हिंगोली शहरातील जवाहर रोडवरील जैन मंदिरासमोर कारची काच फोडून रोख ३,००,००० रुपये लांबवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका कुख्यात टोळीचा माग काढून त्यांच्या घरातून एकूण २,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ​सेनगाव तालुक्यातील खुडज येथील अरुण टाले हे ता १९ ऑगस्ट रोजी…

Read Full News

राहुल गांधी म्हणाले- ओळखीच्या आधारावर हल्ला ही शोकांतिका:मणिपुरी संगीतकाराला श्रद्धांजली वाहिली; दिल्लीत 4 दिवसांपूर्वी 6 लोकांनी घरात घुसून ठार मारले होते

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मणिपूरचे दिवंगत संगीतकार चोंगथम विक्रम सिंह यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी त्यांनी विक्रम यांच्या हत्येला दुःखद म्हटले आणि सांगितले की, त्यांना केवळ ते कुठून आले होते या कारणावरून लक्ष्य करण्यात आले. राहुल गांधी म्हणाले की, एका तरुणाची हत्या ही स्वतःच एक मोठी शोकांतिका आहे. यासोबतच एखाद्या व्यक्तीवर…

Read Full News

बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू:चांमणी शिवारातील हृदयद्रावक घटना

पोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैल धुण्यासाठी आजोबांसोबत गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. 9) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील चांमणी शिवारात घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. यश बबन साळवे (वय 9) आणि चेतन बबन साळवे (वय 11) अशी मृत बालकांची नावे आहेत….

Read Full News

6 महिन्यांनंतर प्रशासनाला जाग:पोळ्याच्या मुहूर्तावर दत्तपूर-सेवाग्राम मार्गावर गतिरोधक

मंत्र्यांचा दौरा दत्तपूर-सेवाग्राम मार्गाने जाणार असल्याने या मार्गावरील गतिरोधक काढण्यात आल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. त्यानंतर काढण्यात आलेले गतिरोधक पुन्हा बसविण्यासाठी सातत्याने पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या चालढकल कारभारामुळे तब्बल सहा महिने गतिरोधक बसविण्याचे काम रखडले होते. अखेर पोळा सणाच्या मुहूर्तावर प्रशासनाला जाग आली असून, गतिरोधक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दत्तपूर-सेवाग्राम मार्गावरील…

Read Full News

आयआयएम नागपूर गोव्याची वाहतूक कोंडी सोडवणार:बांधकाम विभागासोबत सामंजस्य करार; सिग्नल आणि पार्किंगमध्ये सुधारणा सुचवणार

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनंतर आता गोवा राज्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आयआयएम नागपूर मदत करणार आहे. आयआयएम नागपूरच्या ‘सेंटर फॉर लॉजिस्टिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ (क्लिप) या केंद्राच्या माध्यमातून गोव्यातील प्रमुख रस्त्यांसाठी वाहतूक सिम्युलेशन आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग मॉडेल तयार केले जाईल. यासाठी गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागासोबत नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. हा…

Read Full News

Samay Raina Responds To Dating Rumors With Sharon Verma

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉमेडियन समय रैनाचे नाव गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन शेरोन वर्मासोबत जोडले जात आहे. इंडियाज गॉट लेटेंटच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या शेरोन लेटेंट सीझन 2 च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये पॅनेलिस्ट म्हणून आली होती. तेव्हा असा दावा करण्यात आला की, एपिसोडचे शूटिंग संपल्यानंतरही समय रैना तिथेच बसून तासभर शेरोनशी बोलत राहिला….

Read Full News

Dagdusheth Ganpati Utsav 2026 Pune; Prem Mandir Replica Pranpratishtha

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा वृंदावन येथील प्रसिद्ध ‘प्रेम मंदिरा’ची भव्य प्रतिकृती गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. गणेश चतुर्थीला सोमवारी (१४ सप्टेंबर) सकाळ . वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी सकाळी…

Read Full News

आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा:महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; सोनाली कांबळेंचा पोलिसांवर दुजाभाव केल्याचा आरोप

महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी सोनाली त्रिंबक कांबळे यांनी केली आहे. संतोष पंडित यांच्यावर तत्काळ कारवाई झाली, तशीच कारवाई गायकवाड यांच्यावरही व्हावी, असे म्हणत त्यांनी पोलिसांवर दुजाभावाचा आरोप केला. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून…

Read Full News

लडाखच्या मुद्द्यावर सोनम वांगचुक यांचा इशारा:म्हटले- सरकारकडून आश्वासन मिळाले नाही तर 19 ते 24 सप्टेंबरपर्यंत आंदोलन करणार

लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या लेह आणि कारगिलच्या नेत्यांच्या बैठकीवर निराशा व्यक्त केली. वांगचुक म्हणाले की, जर लडाखच्या मुद्द्यावर सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही, तर 19 ते 24 सप्टेंबरपर्यंत पुन्हा आंदोलन केले जाईल. त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले – आम्हाला सरकारवर विश्वास आहे, म्हणूनच आम्ही प्रत्येक वेळी सरकारशी चर्चा करण्यासाठी येतो. आशा…

Read Full News

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य:मुख्यमंत्री फडणवीसांचे पेपर पुनर्तपासणीसह SIT चौकशीचे आश्वासन, 8 दिवसांत कारवाईचे आदेश

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालावरून आणि कथित पेपरफुटीवरून आक्रमक झालेल्या MPSC विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेली महत्त्वपूर्ण बैठक यशस्वी ठरली असून, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पेपरची पुनर्तपासणी करण्याचे आणि पेपरफुटीच्या प्रकरणाची थेट ‘एसआयटी’ (SIT – विशेष…

Read Full News