काटवन परिसरात डाळिंब बागांवर चोरट्यांचा डोळा; 135 किलो चोरी:नामपूर पाेलिसांनी जप्त केला 90 हजारांचा ऐवज, तिघे संशयित ताब्यात
दुष्काळी परिस्थितीत विहिरीच्या पाण्यावर कष्टाने जोपासलेल्या डाळिंब बागांवर चोरट्यांची नजर पडल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. बिलपुरी (ता. सटाणा) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी पितांबर दिलीप पवार यांच्या गट क्रमांक २०/३ मधील दोन एकर २७ गुंठे क्षेत्रातील बागेतून चोरट्यांनी सुमारे १३५ किलो डाळिंब चोरून नेले. चार गोण्यांत भरलेले डाळिंब दोन दुचाकींवरून मालेगाव येथे विक्रीसाठी नेत असताना…