Headlines

सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 74,200 वर:निफ्टीही 250 अंकांनी घसरला; 23,250 वर करत आहे व्यवहार

आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 74,200 वर आला आहे. निफ्टीमध्येही 250 अंकांची घसरण झाली असून तो 23,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज आशियाई बाजारांमध्येही घसरण 10 सप्टेंबर रोजी अमेरिकन बाजारांमध्ये घसरण झाली होती घरगुती गुंतवणूकदारांनी 7 दिवसांत 4,451 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले काल बाजारात…

Read Full News

नीलेश सरवदेंची 1000 कि.मी.ची सायकलिंग मोहीम:75 तासांची वेळ असताना अवघ्या 73 तास 55 मिनिटांत गाठला अंतिम टप्पा‎

व्यवसायातील व्यस्तता सांभाळत प्रबळ इच्छाशक्ती, कठोर सराव आणि अफाट सहनशक्तीच्या बळावर येथील कपडे व्यापारी नीलेश सरवदे यांनी तब्बल एक हजार किलोमीटरची ‘बीआरएम १००० किमी’ सायकलिंग मोहीम अवघ्या ७३ तास ५५ मिनिटांत पूर्ण केली. या मोहिमेसाठी ७५ तासांची निर्धारित वेळ असताना त्यांनी तीन तास आधीच अंतिम टप्पा गाठत बार्शीच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे….

Read Full News

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख मदत द्या:मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही; रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

पावसाचा मोठा खंड आणि माना टाकलेली पिके यामुळे राज्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटातून जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दुष्काळाची दाहकता, कर्जमाफी आणि पीक विम्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत, आगामी…

Read Full News

खेळण्यातील नोटा समृद्धीवर टाकून सावज हेरत लुटण्याचा डाव पोलिसांनी उधळला:कोपरगावात दरोड्याच्या तयारीतील ठाण्यातील टोळीतील चौघे जेरबंद, एक फरार‎

समृद्धी महामार्गावर खेळण्यातील खोट्या नोटा रस्त्यावर टाकून वाहने थांबवायची आणि चालक खाली उतरताच त्याला लुटायचे, असा अत्यंत भीषण डाव रचणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील एका कुख्यात लुटारू टोळीच्या कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. महामार्गावर . ९ सप्टेंबर रोजी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोपरगाव पोलीस समृद्धी महामार्गावर गस्त घालत होते. या दरम्यान नगर-मनमाड रस्त्यावरील…

Read Full News

ग्रामीण मराठी साहित्य संमेलन:शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची पेरणी करणारे दीपस्तंभ- लंके गुरुजी

शिक्षक हे भावी पिढीला मार्ग दाखवणारे आणि विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची पेरणी करणारे दीपस्तंभ आहेत. बदलत्या काळातही शिक्षकांना समाजात सन्मानाचे स्थान असून, त्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन ज्ञानदेव लंके गुरुजी यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे गुरुवारी आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. स्व. पै. किसनराव…

Read Full News

उमर अब्दुल्ला म्हणाले- वंदे मातरम कधीही स्वीकारले नाही:सरकारी कार्यक्रमांत प्रोटोकॉल आवश्यक; पूर्ण गाणे गायल्याने काँग्रेसने घेतला होता आक्षेप

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, त्यांच्या पक्षाने कधीही वंदे मातरमला पक्ष म्हणून स्वीकारले नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही. हा पक्षाच्या विचारसरणीचा आणि राजकीय निर्णयाचा विषय आहे. तथापि, उमर यांनी स्पष्ट केले की, सरकारी कार्यक्रमांमध्ये लागू असलेल्या नियमांचे आणि प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, हे नियम केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशातील…

Read Full News

अकोल्यात 125 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी घडवले बाप्पा:अकोले नगरपंचायतीचा माझी वसुंधरा 7.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2026-27 अंतर्गत पर्यावरणपूरक गणेश जागर‎

भक्ती, कला आणि निसर्ग संवर्धनाचा त्रिवेणी संगम साधत अकोले नगरपंचायतीने “दिव्य मराठी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७’ अंतर्गत ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव-निसर्गाशी नाते . कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, सोमेश्वर उर्फ बबलू धुमाळ, नगरसेवक नवनाथ शेटे, इंजि. प्रदीपराज नाईकवाडी, अमोल वैद्य यांच्यासह नगरपंचायत…

Read Full News

अभियांत्रिकीच्या नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत,पालकांच्या हस्ते वृक्षारोपण:श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकीत पालक-शिक्षक मेळावा‎

प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यासाठी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मॅनेजमेंट-टीचर्स-पॅरेंट्स-स्टुडंट कन्वेंशन’ आयोजित करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आली. कार्यक्रमानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवर तसेच पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज…

Read Full News

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस:आज अभिजीत दीपके घेणार जरांगेंची भेट; 12 तारखेला ठरणार मुंबई आंदोलनाची दिशा

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. दरम्यान, आज कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा…

Read Full News

कळमनुरी उपविभागात कुणबी जातीच्या 472 नोंदी आढळल्या:नागरिकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन, एसडीएम प्रतिक्षा भुते यांची माहिती

कळमनुरी उपविभाग अंतर्गत कुणबी प्रमाणपत्रांसाठी मंडळ निहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी केले आहे. कळमनुरी उपविभागातील तहसिल कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि सह दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत जुन्या अभिलेखांची पाहणी व तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान 29 गावांमध्ये कुणबी जातीच्या एकूण 472 नोंदी…

Read Full News