Headlines

नीलेश सरवदेंची 1000 कि.मी.ची सायकलिंग मोहीम:75 तासांची वेळ असताना अवघ्या 73 तास 55 मिनिटांत गाठला अंतिम टप्पा‎




व्यवसायातील व्यस्तता सांभाळत प्रबळ इच्छाशक्ती, कठोर सराव आणि अफाट सहनशक्तीच्या बळावर येथील कपडे व्यापारी नीलेश सरवदे यांनी तब्बल एक हजार किलोमीटरची ‘बीआरएम १००० किमी’ सायकलिंग मोहीम अवघ्या ७३ तास ५५ मिनिटांत पूर्ण केली. या मोहिमेसाठी ७५ तासांची निर्धारित वेळ असताना त्यांनी तीन तास आधीच अंतिम टप्पा गाठत बार्शीच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. फ्रान्सच्या ऑडॅक्स क्लबच्या मान्यतेने आणि पहिल्यांदाच बार्शी सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित या मोहिमेची सुरुवात बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून झाली. बार्शी, सोलापूर, तुळजापूर, बीड, अंबड आणि परतीच्या प्रवासात सोलापूर, टेंभुर्णी, थेऊर फाटा, टेंभुर्णी, बार्शी असा अत्यंत खडतर मार्ग सायकलपटूंना पार करावा लागला. या मार्गावर पाच हजार मीटरपेक्षा अधिक चढाई होती. त्यातच प्रचंड ऊन, अवघड चढ, बदलते हवामान, शारीरिक थकवा आणि झोपेचा अभाव अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. तरीही नीलेश सरवदे यांनी जिद्द कायम ठेवत सलग ७३ तास ५५ मिनिटे सायकल चालवून एक हजार किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. या मोहिमेत सहभागी सायकलपटूंना गेवराई, टेंभुर्णी आणि बार्शी येथील नियंत्रण केंद्रांवर निर्धारित वेळेत पोहोचणे बंधनकारक होते. प्रवासादरम्यान विश्रांती, खाणे- पिणे, सायकलची देखभाल, वेळेचे नियोजन या सर्व बाबी सायकलपटूला सांभाळाव्या लागतात. कपड्यांच्या व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नीलेश सरवदे यांनी सायकलिंगमधील या असामान्य यशातून वय, व्यवसाय आणि व्यस्त दिनक्रम हे ध्येयाच्या आड येत नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. ‘बीआरएम १०००’साठी १३ सायकलपटूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन जणांनी मोहिमेला सुरुवात केली नाही, तर तीन जणांना प्रवासादरम्यान मोहीम सोडावी लागली. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत सात सायकलपटूंनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. यामध्ये राहुल कुंभार यांनी ६५ तासांत, तर नीलेश सरवदे यांनी ७३ तास ५५ मिनिटांत अंतिम टप्पा गाठला. १३ जणांची नोंदणी, ७ जणांची मोहीम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *