![]()
प्रभाग क्रमांक ४ मधील मोठी उमरी परिसरातील विठ्ठलनगर, गल्ली क्रमांक ३ येथे गेल्या महिनाभरापासून नळाची पाइपलाइन फुटलेली असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही या समस्येची अद्याप दुरुस्ती झालेली नसल्याने परिसरा
.
विठ्ठलनगरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये जलवाहिनी फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून येत आहे. गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती कायम असल्याने रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. रस्त्यावर सातत्याने पाणी साचून राहिल्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाच नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत असताना दुसरीकडे फुटलेल्या पाइपलाइनमधून पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.