Headlines

पीएमआरडीएचा विकास आराखडा अधिक गतिमान करा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा अधिक गतिमान आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे महानगर प्रदेशाचा वेगाने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण लक्षात घेऊन त्यांनी हे निर्देश दिले. पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक, पाणी, पर्यावरण, उद्योग, पर्यटन आणि अग्निसुरक्षा यांचा एकत्रित विचार करून पुढील अनेक वर्षांचे नियोजन…

Read Full News

बिपाशा बसूच्या प्रोटीन ड्रिंकमध्ये किडे दिसले:तुकाराम मुंढे यांच्याकडे मदत मागितली, म्हणाली- तुम्हीच आमची एकमेव आशा आहात

अभिनेत्री बिपाशा बसूला प्रोटीन पावडरच्या नुकत्याच उघडलेल्या डब्यात छोटे छोटे किडे सापडले आहेत. तिने याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. बिपाशाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले आणि या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. बिपाशाने ड्रिंकच्या व्हिडिओसोबत लिहिले आहे, ‘तुकाराम मुंढे, तुम्हीच आमची एकमेव आशा आहात. जेणेकरून आम्ही जे काही…

Read Full News

भाजपचा बडा नेता काँग्रेसमध्ये येणार होता, पण…:पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; सद्य:स्थितीला 'लोकशाही' म्हणणे धाडसाचेच

“आज देशात जे काही सुरू आहे, त्याला ‘लोकशाही’ म्हणायला फार मोठे धाडस लागेल. कोणत्याही राजकीय पक्षात आता अंतर्गत लोकशाही उरलेली नाही, हे मी अत्यंत धाडसाने सांगतोय,” अशी खळबळजनक आणि थेट प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते….

Read Full News

IMF ने म्हटले- भारत जगाचे ग्रोथ इंजिन:जीडीपी वाढ अंदाजित 7.8% पेक्षा चांगली, ऊर्जा संकटातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहिली

भारताच्या अर्थव्यवस्थेने ऊर्जा संकट आणि जागतिक आव्हानांमध्येही आपली वेगवान गती कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जूनमध्ये देशाची वास्तविक जीडीपी वाढ ७.८% नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत म्हटले आहे की, मजबूत सेवा क्षेत्र आणि चांगल्या निर्यातीमुळे ही वाढ अपेक्षेपेक्षा खूपच चांगली राहिली आहे. आयएमएफने…

Read Full News

पानकनेरगावात बैलांच्या बाशिंगावर झळकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा:कर्जमाफीसह हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे हातबलता आणि दुसरीकडे पोळासारखा महत्त्वाचा सण या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैलाच्या बाशिंगांवर विविध मागण्यांचे फलक लावून शासनाला साद घातली आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील आगळावेगळा पोळा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता मांडणारा ठरला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पिके हातची गेली आहेत. सोयाबीनचे पीक वाळून गेले असून…

Read Full News

पाकिस्तान धार्मिक यात्रेचे नियम बदलले, खासगी टूरवर बंदी:आता SGPC-HSGMC द्वारेच जत्थे जातील, हिसारची ज्योती मल्होत्रा स्पॉन्सर्ड टूरनेच गेली होती

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणलेले पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्क आणि हिसारच्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर केंद्र आणि हरियाणा सरकारने भारत-पाक धार्मिक यात्रांबाबत कठोर नियम लागू केले आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीत हे उघड झाले आहे की पाकिस्तानची गुप्तचर संस्था (ISI) आणि तेथील खासगी टूर ऑपरेटर्स धार्मिक टूरच्या नावाखाली भारतीय नागरिकांना प्रायोजित करून हेरगिरीचे जाळे विणत होते….

Read Full News

पुण्यात FDAची मोठी कारवाई:बुधवार पेठेत 4 ट्रक पनीर-खवा जप्त, गणेशोत्सवाआधी भेसळीविरोधात धडक मोहीम

गणेशोत्सवाच्याआधी पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने पनीर आणि खव्याने भरलेले चार ट्रक जप्त केले. हा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने कारवाईसाठी अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. गणेशोत्सवात मिठाई, मोदक, पेढे आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या पदार्थांमध्ये खवा आणि पनीरचा वापर जास्त असतो. त्यामुळे या…

Read Full News

मनोज जरांगेंना वाऱ्यावर सोडणं हा अमानुषपणा:संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, नांदेडमध्ये 'तुमसे ना हो पायेगा' जनआंदोलन

मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. सरकारने मनोज जरांगे यांना वाऱ्यावर सोडले असून, त्यांच्याकडे फिरकायचे नाही असे आदेश प्रशासनाला देणे हा अमानुषपणा आणि क्रौर्य असल्याचा घणाघात राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, मराठवाड्यातील…

Read Full News

राजापेठमध्ये नागपूर एक्सप्रेस 40 मिनिटे खोळंबली:नियोजनाच्या अभावाचा माॅडेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना फटका; प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप‎

अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवर गुरुवार १० रोजी सकाळी नियोजन चुकल्यामुळे नागपूर- अमरावती एक्सप्रेस राजापेठ परिसरात ४० मिनिटे थांबवण्यात आली. रेल्वे स्टेशनवर केवळ ५ मिनिटे पोहोचण्यास शिल्लक असताना एवढा वेळ गाडी का थांबवण्यात आली तेही प्रवाशांना कळत नसल् . स.९.५० ऐवजी १०.३९ वाजता स्टेशनवर नागपूर-अमरावती एक्सप्रेसची पोहोचण्याची वेळ स. ९.५० वाजताची आहे. चांदूर रेल्वे स्टेशन स.९.१४…

Read Full News

SEBC Reservation Importance; Dr. Balasaheb Sarate Analysis

छत्रपती संभाजीनगर10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंदोलन गावात करा की मुंबईत करा, तूर्तास तरी आंदोलनाने मराठा समाजाला कोणताही जास्तीचा किंवा नवीन लाभ मिळणार नाही. सरकारने काय दिले आणि आंदोलनाने काय मिळाले याचा विचार करण्यात समाजाची दोन वर्षे गेली. आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण गरजूंना आरक्षणापर्यंत पोहोचवणे त्याहून जास्त महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे…

Read Full News