दीर्घ प्रतीक्षेनंतर संधी; सीईओंच्या हस्ते 190 शिक्षकांना नियुक्तीपत्रे:पदे भरल्याने आदिवासी भागात शैक्षणिक दर्जा उंचावणार
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती प्रक्रियेतील अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, गुरुवारी १० सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हा परिषदेत आनंददायी वातावरणात १९० नवनियुक्त शिक्षण सेवकांना पदस्थापना व नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या भरती प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाल्याने आणि हातात थेट नियुक्तीपत्र पडल्याने उपस्थित शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मुख्य…