Headlines

नांदगाव पेठच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड:भूमिका अभिनयात ‘चिंटू के पापा की हवाई बातें’ नाटिका प्रथम




राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. भूमिका अभिनय प्रकारात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर जिल्हास्तरावरही प्रथम क्रमांक पटकावत शाळेने विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव विकसित व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. आता विभागीय स्तरावर नांदगाव पेठची कामगिरी महत्त्वाची ठरणार असून पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यशाबद्दल प्राचार्य देवेंद्र ठाकरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विभागीय स्तरावरही शाळा उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गटशिक्षणाधिकारी श्वेता गोळे, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप बोडखे, केंद्रप्रमुख वंदना पांडे, कविता उघडे, विषय साधन व्यक्ती नलिनी गोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेतील रामकृष्ण उपरीकर, कल्पना वऱ्हेकर, संजय डांगे, कल्पना देशमुख, प्रणाली ढोणे, विजय गुरव, डॉ. जयश्री इंगळे, ज्योती नारखेडे यांनी अभिनंदन केले. नाटिकेमधूनकेली सामाजिक जनजागृती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. चुरशीच्या भूमिका अभिनय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, संवादफेक आणि मंचावरील सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची दाद मिळवली. ‘मूल्य और जिम्मेदार नागरिकता’ या विषयावर आधारित ‘चिंटू के पापा की हवाई बातें’ या नाटिकेतून सामाजिक संदेश देतानाच विद्यार्थ्यांनी आपले कलागुणही प्रभावीपणे सादर केले. डॉ.जयश्री इंगळे यांचे दिग्दर्शन; गौरी, आरुष, हर्ष,वेदांत, यथार्थचा अभिनय लक्षवेधी ‘चिंटू के पापा की हवाई बातें’ नाटिकेचे दिग्दर्शन डॉ. जयश्री इंगळे यांनी केले. गौरी खंडारे, आरुष सुंदरकर, हर्ष बानासुरे, वेदांत बावनकुळे आणि यथार्थ राजेश हेंडवे यांनी भूमिका साकारल्या. आत्मविश्वासपूर्ण अभिनय व नेमक्या संवादफेकीमुळे नाटिकेने विशेष लक्ष वेधले. नाटिकेस सुनील धर्माळे यांचे सहकार्य लाभले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *