160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा:लिपिक साळुंखे शिरपूरमधून ताब्यात, अपहारातील आणखी एक मास्टरमाइंड गळाला, बडे मासे लवकरच येणार
शिक्षण क्षेत्रातील १६० कोटींचा बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढतच असून संस्थाचालक, मुख्याध्यापक, एजंट, शिक्षणाधिकारी ते शिक्षण संचालक अशा सर्वांच्या संगनमताने तब्बल ८४१ बोगस शिक्षक भरती केल्याचे तपासात उघडकीस आले. हा तपास राजकीय क्षेत्रातील शिक्षणसम्राटांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करुन या तपासाला गती दिली आहे. याच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रशांत वाडिले याचा…