Headlines

स्टील दुकानाच्या आडून चालणाऱ्या तांबे चोरीचा जामखेड पोलिसांकडून पर्दाफाश:शेती पंपाच्या 1,635 किलो तांब्याच्या तारांसह दुकानमालक पोलिसांच्या जाळ्यात‎

शहरातील तपनेश्वर रोडवरील एका नामांकित स्टील आणि भांड्याच्या दुकानावर जामखेड पोलिसांनी गुरुवारी (१६ जुलै) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना दुकानातून शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या सोललेल्या तारांचे लहान-मोठे तुकडे असलेल्या तब्बल ३९ गोण्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या या १,६३५ किलो तांब्याची बाजारपेठेतील किंमत ९ लाख ७९ हजार २०० रुपये आहे….

Read More

रात्रभर चालले CJP चे आंदोलन, बॅरिकेडिंग तोडली:वांगचुक यांच्या पत्नीही पोहोचल्या, लोक रस्त्यावर झोपले; 14 PHOTOS-VIDEOS

कॉकरोच जनता पार्टी (CJP) सकाळी 9 वाजता जंतर-मंतरपासून संसदेपर्यंत ‘चलो संसद’ मोर्चा काढणार आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. जंतर-मंतरवर 10 हजार आंदोलक जमले आहेत. आंदोलन रात्रभर सुरू होते. लोक मध्यरात्रीपर्यंत आंदोलनात सहभागी होण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचत राहिले. सोमवारी सकाळी सुमारे 5.30 वाजता आंदोलकांनी पोलिसांची बॅरिकेडिंग तोडली. पाहा 14 फोटो-व्हिडिओ…

Read More

वारीच्या भक्तिमय वातावरणामध्ये वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा जागर

आषाढी वारीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माला समाजप्रबोधनाची जोड देत शहरात अवयवदान चळवळीबद्दल जनजागृती करण्यात आली. नेत्रदान व अवयवदानासाठी सातत्याने जनजागृती करणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या अवयवदान समुपदेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न…

Read More

नसीरुद्दीन शाह@76: पाक मुलीशी केले लपून लग्न:मित्राने मत्सरापोटी चाकू खुपसला; आईने विचारले होते- रत्ना मुस्लिम होईल का?

ही 1960 च्या दशकातील गोष्ट आहे. एक सडपातळ मुलगा होता. त्याला अभिनेता बनण्यासाठी मुंबईला जायचे होते. एके दिवशी त्याच्या एका मित्राच्या मैत्रिणीचे पत्र आले की, मुंबईला ये, माझे वडील चित्रपटांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत, ते तुला मदत करतील. त्यानंतर तो मुंबईला निघाला. मात्र, ज्या मुलीच्या भरवशावर तो मुंबईला पोहोचला, ती स्वतः खूप साधे जीवन जगत होती….

Read More

विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा बुरुडगावातून पंढरीकडे मार्गस्थ:बुरुडगाव येथील दिंडीतील वारकऱ्यांचा विमा, रुग्णवाहिकेचीही सोय‎

तालुक्यातील बुरूडगाव येथील पावन हनुमान मंदिर श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडी सोहळा आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मार्गस्थ झाला. गावातील प्रत्येक रस्ता विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. विठ्ठलन . यादव परिवाराच्यावतीने दिंडीसाठी चांदीच्या पादुकांची भेट देण्यात आली. या पादुकांचे पूजन करून भक्तिभावाने पालखीत विराजमान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

सत्य परिस्थिती प्रभाविपणे समाजासमोर पोहोचवण्यात छायाचित्रकारांचे योगदान:सटाण्यातीलनिकॉन कार्यशाळेत नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांचे प्रतिपादन‎

छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, भावना आणि वास्तव प्रभावीपणे जतन केले जाते. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील सत्य परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात छायाचित्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सटाणा नगराध्यक्षा हर्षद . येथील सप्तपदी लॉन्स येथे बागलाण तालुका छायाचित्रकार फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त तसेच निकॉन कंपनीच्या विशेष छायाचित्रण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात छायाचित्रकारांनी आधुनिक उपकरणे…

Read More

President Murmu Moldova Visit; PV Sindhu Wins Japan Open 2026

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मोल्दोव्हा येथे पोहोचल्या 20 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूर्व युरोपमधील मोल्दोवा देशात पोहोचल्या आहेत. त्या आज मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांची भेट घेतील. मुर्मू मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर…

Read More

वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी मंदिरांमध्ये त्वरित बसवा सीसीटीव्ही:लासलगावमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांचे आवाहन‎

शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लासलगाव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अलीकडील चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंदिरांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन यावेळी सागर कोते यांनी केले. बैठकीत मंदिर परिसरात दर्जेदार सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू रात्री सुरक्षित ठिकाणी…

Read More

तोंडापूरच्या धरण काठावर घातक रसायनाची गळती:तीन रोही मृत्युमुखी, पक्षी व वन्यजीवांवर संकट‎

अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून ठेवलेल्या २३ घातक रसायनांच्या ड्रममधून झालेल्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. यापूर्वी धरणातील मासे आणि तोंडापूर गावातील ८ ते १० शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी याच रसायनांमुळे दगावले होते. आता हाच प्रादुर्भाव वन्यजीवांपर्यंत पोहोचल्याची शंका डॉ….

Read More

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण:माजी नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कारागृहात रवानगी

डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर आणि विष्णुनगर पोलिसांनी बजावलेल्या कायदेशीर नोटिसीनंतर अखेर मुख्य आरोपी व माजी नगरसेवक रमेश म्हात्रे याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. कल्याण सत्र न्यायालयाने म्हात्रेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कल्याणच्या आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात येत…

Read More