Headlines

अहिल्यानगरमध्ये जेवण न दिल्याने पत्नीचा भींतीवर डोके आपटून खून‎:वाद सुरू असतानाच सासऱ्याने सुनेच्या ‎नातेवाईकाला कळवले‎, आरोपी पतीला गेवराईतून अटक

जेवण न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुरुडगाव येथील तांबे मळा परिसरात घडली आहे. मनिषा सुभाष खरात असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी पती सुभाष रखमाजी खरात याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगर तालुका पोलिसांनी…

Read More

सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 77,700 वर:निफ्टी देखील 120 अंकांनी खाली 24,200 वर, बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्स आज 20 जुलै रोजी 500 अंकांनी (0.65%) घसरणीसह 77,600 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 120 अंकांची (0.50%) घसरण आहे, तो 24,200 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार: दक्षिण कोरियाचा निर्देशांक 4% घसरला शुक्रवारी अमेरिकन बाजारातही घसरण झाली शुक्रवारी सेन्सेक्स वाढीसह बंद झाला होता शुक्रवार, 17…

Read More

सरकार पोरांना घाबरलेय, मोर्चा ईडीच्या दिशेने वळवायला हवा:विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून संजय राऊतांची सरकारवर टीका

नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) विद्यार्थ्यांचा संसदेवरील मार्च पोलिसांनी रोखल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘५६ इंच वाल्यांची हातभर फाटलीय’ विद्यार्थ्यांच्या संसदेवरील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विटर एक्सवरुन एक अत्यंत आक्रमक पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. राऊत…

Read More

'कोठीत बहिणीची बॉडी… बाहेर पोलिसांचे चहापाणी':भाऊ म्हणाला- आधी तब्येत खराब सांगितली, अचानक मृतदेह घेऊन आले, चेहराही लपवला

कोठीच्या आत बहिणीचा मृतदेह पडला होता, बाहेर पोलिस कर्मचारी चहा पीत होते…मला फक्त एकदा तिचा चेहरा बघायचा होता, पण मला भेटूही दिले नाही. हे म्हणणे आहे चंदीगडमध्ये निवृत्त IPS अधिकाऱ्याच्या कोठीत मृत आढळलेल्या युवती पप्पीचा भाऊ राहुलचे. राहुलने सांगितले की तो सेक्टर-10 येथील कोठीवर सर्वात आधी पोहोचला होता. त्यावेळी सकाळचे 8:30 वाजले होते. कोठीच्या बाहेर…

Read More

कदमापूर जि.प. शाळेत 5 मिनिटांत 40 पालकांपर्यंत थेट शिक्षण संवाद:शिक्षक राजेश कोगदे यांची संकल्पना; शालेय प्रगतीचे ‘ड्रीप इरीगेशन’‎

आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित निरीक्षण कसे करता येऊ शकते, याचा आदर्श प्रयोग कदमापूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी साकारला आहे. ‘ड्रीप इरीगेशन’ अर्थात ठिब . शेतीमध्ये कमी पाण्यात प्रत्येक रोपापर्यंत समान प्रमाणात पाणी पोहोचवून त्याची वाढ सक्षम केली जाते. याच धर्तीवर शिक्षक कोगदे यांनी…

Read More

दिव्य मराठी एक्सपोझ:डेटिंग ॲपद्वारे जाळ्यात ओढून तरुणांचा शारीरिक छळ, लूटही, ‘शिकार’ हेरण्यासाठी साेलापुरात टोळी सक्रिय

डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढणारी आणि त्यांची लूटमार करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. बदनामीच्या भीतीचा अस्त्र म्हणून वापर करत, या टोळीने अनेक तरुणांना आपला शिकार बनवले आहे. मात्र, नुकत्याच एका पीडित तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे विजापूर नाका पोलिसांनी या टोळीतील 5 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. समाजात बदनामी होईल, या दहशतीखाली अनेक तरुणांनी अन्याय…

Read More

मोकाट जनावरांमुळे पालक संतप्त:ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात पसरली नाराजी‎

येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेसमोरील चावळी चौकात भटक्या व मोकाट जनावरांचा दिवसेंदिवस वाढत असलेला वावर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत आहे. शाळा सुरू होण्याच्या व सुट्टीच्या वेळेत मोठ्या संख्येने गायी, बैल व वासरे शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आणि रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने चिमुकल्या विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करावी लागत आहे. प्रत्यक्ष पाहणीत शाळेच्या…

Read More

देशाच्या 70% भागात ढगाळ वातावरण:25 जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट; राजस्थानच्या 3 जिल्ह्यांतील पारा 41 डिग्रीच्या वर

इस्रोच्या उपग्रह प्रतिमांनुसार, देशाच्या सुमारे 70% भागावर मान्सूनचे ढग दाटले आहेत. पुढील 25 जुलैपर्यंत उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतासह देशाच्या 60% पेक्षा जास्त भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 24% कमी आहे. राजस्थानमध्ये मान्सूनने विश्रांती घेतल्याने उष्णता वाढू लागली आहे. बिकानेर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये रविवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले….

Read More

विठुरायाच्या भेटीला निघाले 41 वारकरी:मोर्शी आगारातून विशेष बस पंढरपूरकडे रवाना, 29 महिला भाविकांचा समावेश‎

विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल असा एकच गजर, मनात विठुरायाच्या भेटीची आस आणि पंढरपूरच्या दिशेने वेगाने धावणारे मन अशा स्थितीतील मोर्शी येथील ४१ वारकरी एकत्रितपणे पंढरपूरकडे एकाच पंढरपूर वारी स्पेशल या एकाच एसटी बसने रवाना झाले. वारकरी पंढरपूरकडे निघण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी एकाच गावातील वारकरी एकाच एसटीतून पंढरपूरकडे निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:ट्रकच्या धडकेनंतर कारने घेतला पेट, 5 जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर…

Read More