राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार:हवामान विभागाकडून येलो अलर्ट; मराठवाडा, विदर्भासह पुणे-साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला असून, राज्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असली, तरी मुंबईसह उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. कमी दाबाचा पट्टा आणि ‘येलो अलर्ट’ बंगालच्या उपसागरात १.५…