![]()
जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी आमदार कुचे गाडीत नसल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या दुर्घटनेत गाडीतील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात आज पहाटे हा अपघात घडला. धोकादायक वळणावर कार नियंत्रित न झाल्यामुळे उलटल्याची माहिती आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरच भीषण रितीने उलटली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. आमदार कुचे कसे बचावले? सुरुवातीला या गाडीतून आमदार नारायण कुचे यांच्यासह चौघे जण पंढरपूरकडे प्रवासाला निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान काही कामानिमित्त आमदार कुचे एका ठिकाणी गाडीतून खाली उतरले. त्यानंतर त्यांचा चालक आणि अंगरक्षक बॉडीगार्ड दुसऱ्या एका व्यक्तीला आणण्यासाठी गाडी घेऊन पुढे गेले. त्या व्यक्तीला घेऊन परत येत असतानाच वाटेत हा भयंकर प्रसंग ओढवला. सुदैवाने नेमक्या त्याचवेळी आमदार गाडीत नसल्याने मोठा अनर्थ टळला आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू या दुर्घटनेत आमदारांचा चालक आणि बॉडीगार्ड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांच्यासोबत असलेला आणखी एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही जखमींना तात्काळ जालना येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. हेही वाचा.. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: इथेनॉल टँकर पलटल्याने सुरू होती एकेरी वाहतूक, ट्रकच्या धडकेनंतर कार पेटली; 6 जणांचा मृत्यू समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि ते आतच जिवंत होरपळले. तर धडक देणाऱ्या मालवाहू वाहनातील दोन व्यक्तीचांही मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वाचा
Source link
विठूरायाच्या दर्शनाला जाताना दुर्देवी घटना:आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात; तिघे जण जखमी