मुख्यमंत्र्यांमध्ये माणुसकीच उरली नाही:एका चिमुकलीवर अत्याचार झाला अन् तुम्ही पेढे वाटताय? नसरापूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा संताप
पश्चिम बंगालमधील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत भाजप नेत्यांनी पेढे वाटले आणि जल्लोष केला. मात्र, या जल्लोषावर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी कडाडून टीका केली आहे. पुण्याच्या नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेची आठवण करून देत, “राज्यात वारंवार अत्याचार सुरू आहे. एका मुलीच़ी बलात्कार करून हत्या झाली आणि तुम्ही पेढे वाटत…