शिक्षक दिन विशेष:गावचा कायापालट अन् एकल महिलांचे अश्रू पुसणारा शिक्षकाचा हात
शाळेच्या चार भिंतींत केवळ अक्षरओळख होत नसते, तर तिथे एका संवेदनशील मनाची आणि पर्यायाने उद्याच्या सजग समाजाची पायाभरणी होत असते. शिक्षकाने दिलेली एक छोटीशी ठिणगी पुढे जाऊन समाज परिवर्तनाचा वणवा किंवा विकासक्रांतीची मशाल कशी बनू शकते. याचे उदाहरण शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचे कार्य आहे. शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणारा घटक…