Headlines

पुण्यात ‘डीजे’चे वाढलेले स्तोम कमी होताना लवकरच दिसेल- फडणवीस:बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत विचारांविषयी दिला उपरोधिक सल्ला

गणेशोत्सवात ‘डीजे’च्या आवाजाविरुद्ध पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी अतिशय शुद्ध मराठी भाषेतील शब्द वापरत मोहीम हाती घेतली. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याने वातावरण तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या हल्ल्याचा निषेध केला. पुण्यात डीजेचे स्तोम माजले आहे. ते लवकरच कमी होताना किंवा कायमचे बंद होताना दिसेल, असे ते म्हणाले. बापट यांच्या भाषेची शुद्धता चांगली असली तरी…

Read More

डीजेविरोधात 1 लाख दंड, 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद:पण 5 हजारांत सुटका, एमपीसीबीने दाखल केलेल्या 636 खटल्यांपैकी अनेक प्रलंबित

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात डीजेच्या दणदणाटाने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या ध्वनिप्रदूषणाविरुद्ध कारवाईसाठी कायदेशीर तरतूद असली तरी, प्रत्यक्ष कारवाई मात्र न्यायालयाच्या पायऱ्यांवर हतबल ठरत आहे. ५ वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपये दंडाची कडक तरतूद असताना, न्यायालयात आरोपी अवघ्या ५ हजार रुपयांच्या किरकोळ दंडावर सुटत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महेश बेडकर विरुद्ध…

Read More

नाशिक जिल्ह्यात आश्रमशाळेतील दुसरीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू:विस्तार अधिकारी, अधीक्षिका व प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

विसापूर आश्रमशाळेतील दुसरीची विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी (८) हिचा संशयास्पद मृत्यू झाला. सेंट्रल किचनमधील शिळ्या जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोप कुटुंबाने केला. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याने विस्तार अधिकारी भगवान निकम, अधीक्षिका स्मिता गायकवाड व प्रभारी मुख्याध्यापक सुनील पवार यांना निलंबित केले. गुरुवारी ताप आल्याने सृष्टीला मुकभणगी आरोग्य केंद्रात नेले होते. रात्री जेवणानंतर उलट्या होऊन मध्यरात्री तिचा मृत्यू…

Read More

National Teacher Award 2026 Winners List

‘शिक्षक’ हा केवळ वर्गात शिकवणारा घटक नसून समाजाची दिशा आणि पिढ्यांचे भविष्य बदलणारा मुख्य शिल्पकार असतो. आज 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून, शिक्षणातील निष्ठा, प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देण्यात येणा . बीडच्या दुर्गम भागातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील ‘कोयता’ सोडवून त्यांना ‘कोडिंग’ शिकवणाऱ्या डॉ. कविता गित्ते(मुख्याध्यापिका, साने गुरुजी निवासी…

Read More

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये तो प्रसंग घेतला आहे का?':शहाजी बापू पाटलांचा सवाल, चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा केला आरोप

मार्च महिन्यात नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ माजली होती. महिलांवर अत्याचार, काळी जादू आणि फसवणूक अशा अनेक गंभीर गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर पोलिस चौकशीत त्याचे एक-एक हादरवणारे कारनामे समोर आले. दरम्यान, आता या भोंदू बाबा अशोक खरातच्या कुकृत्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

Read More

कुडाळ नगरपंचायतीत एसीबीची कारवाई:1200 रुपयांच्या चांदीच्या अंगठीची लाच घेणारा स्वच्छता निरीक्षक जाळ्यात

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ना हरकत दाखला’ देण्याच्या मोबदल्यात 1,200 रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पांडुरंग वासुदेव नाटेकर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, एसीबीच्या या कारवाईमुळे कुडाळ नगरपंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराला कुडाळ शहरात ‘पदमगड ज्वेलर्स’…

Read More

जोगेश्वरीतील SRA प्रकल्पात अपात्रांना सदनिका वाटप:दोघा अधिकाऱ्यांचे निलंबन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जोगेश्वरी, गोरेगाव या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिका वाटपात पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश एसआरए प्राधिकरणाला दिले. त्याचबरोबर ओशिवरा व्हीलेज येथील प्रकल्पात अपात्र लोकांना घरे वाटप केल्याप्रकरणी दोषी संबंधित एसआरएचे सक्षम प्राधिकारी, सहायक निबंधक या दोघा अधिकाऱ्यांना निलंबित…

Read More

सिंहगड कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंत्री पाटील यांच्या आश्वासनानंतर स्थगित:भारतीय मजदूर संघाने शिक्षक दिनाचे धरणे आंदोलन तात्पुरते थांबवले; 13 सप्टेंबर 2026 ला बैठक

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 20 महिन्यांहून अधिक काळाचे वेतन थकीत आहे. या गंभीर प्रश्नावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनी मंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर आयोजित धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश…

Read More

'तुम्ही कधी विचार केलाय का, देव तुमच्याकडे काय मागतो?':मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; दिविजा फडणवीसांनी काय सांगितले? VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपण देवाकडे नक्की काय मागावे आणि काय मागू नये, यावर भाष्य केले आहे. तसेच, खरी भक्ती कशी असावी आणि देवाला भक्तांकडून नेमकी काय…

Read More

साताऱ्यात राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करून शिजवले मांस:वनविभागाकडून आरोपीला बेड्या, वर्ये परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस

राष्ट्रीय पक्षी मोराची सापळा रचून शिकार केल्यानंतर त्याचे मांस शिजवून मेजवानी मारणाऱ्या एका संशयिताला सातारा वनविभागाने तातडीने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. सागर गौतम पवार (वय वर्षे 25, रा. वर्ये , ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ये परिसरामध्ये मोराची शिकार झाल्याची खबर मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान…

Read More