Headlines

हिंजवडी आयटी पार्कच्या रस्त्यांसाठी 426 कोटींचा निधी मंजूर:एमआयडीसीने तातडीने कामे सुरू करावीत; वाहतूक कोंडी कमी होणार

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) यावर तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जास्त आहे, तेथे प्राधान्याने कामे करावीत, असेही त्यांनी सांगितले. हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, मेट्रो जोडणी, सार्वजनिक…

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या दादासाहेब फाळके स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल:पहिला आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल; 31 ऑक्टोबरपर्यंत चित्रपट सादर करण्याचे आवाहन

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटी डब्ल्यूपीयू) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलने विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपले चित्रपट सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. हा महोत्सव कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध…

Read More

नागपुरात डीजे बंदीचे आदेश धाब्यावर:बडकस चौकात दणदणाटात दहीहंडी साजरी, पोलिसांच्या उपस्थितीतच नियमांचे उल्लंघन

नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजेवर बंदी घातली असली, तरी नागपुरात हे आदेश धुडकावत डीजेच्या दणदणाटात दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याचे समोर आले आहे. बडकस चौकात ‘बडकस चौक मित्र परिवार’तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात पोलिसांच्या सूचनेनंतरही डीजे आणि तीव्र लाईट्सचा वापर करत गोविंदा पथकांकडून थर रचण्यास सुरुवात झाली. या मंडळाने सकाळपासूनच डीजे…

Read More

बेल्जियमचे PM म्हणाले- मोदींनी आम्हाला आधीच सावध केले होते:तेव्हा आम्ही ऐकले नाही, अमेरिका-चीनवर अवलंबून राहण्याचा धोका आता समजत आहे

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांनी गुरुवारी सांगितले की, युरोपला आता आर्थिक परावलंबनाचा धोका समजू लागला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपला याबद्दल खूप आधीच सावध केले होते. दिल्लीतील CII च्या कार्यक्रमात ते म्हणाले- जग वेगाने बदलत आहे, पण युरोप या बदलांशी जुळवून घेऊ शकत नाहीये. तो वृद्ध झाला आहे. वेबर यांच्या…

Read More

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांवर सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या दोघांना अटक:कुराश खेळात प्रावीण्य मिळवल्याची खोटी प्रमाणपत्रे वापरली, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळवल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४९) आणि अंकुश विठ्ठल नागर (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना ३ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात…

Read More

सलमान खानने कॅफेला दिला इशारा:म्हणाले- स्वच्छता राखा, नाहीतर त्यांना पाठवून देईन; तुकाराम मुंढे यांच्याकडे इशारा होता का

सलमान खानने त्याची मैत्रीण सृष्टी साहनीच्या मुंबईतील वांद्रे येथे उघडलेल्या नवीन कॅफे ‘द टक शॉप ॲट सेव्हिओज’ चा व्हिडिओ शुक्रवारी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. यासोबतच सलमानने मैत्रिणीला कॅफेची स्वच्छता राखण्याबद्दल विनोदी शैलीत इशारा दिला. सलमानने लिहिले, “सृष्टी, माझी कॉफी रिफिल कर प्लीज. किंमत वाढवू नकोस, गुणवत्ता कायम ठेव. स्वच्छता राख, नाहीतर मी HIM ला पाठवीन…

Read More

संचमान्यता धोरणामुळे 8 ते 10 हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता:पुणे येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन; अन्यायकारक निकष रद्द करण्याची मागणी

उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित संचमान्यता धोरणाविरोधात पुणे येथे गुरुवारी शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या वतीने शिक्षण संचालक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या प्रस्तावित संचमान्यता मसुद्याचा निषेध करत प्रचलित निकषांनुसार संचमान्यता करण्याची मागणी करण्यात आली. शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांनी यावेळी…

Read More

महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत:सतेज पाटलांचा हल्लाबोल; धनंजय महाडिकांच्या 25-0 विजयाच्या दाव्याची उडवली खिल्ली

महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत आल आहे, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे, असा हल्लाबोल सत्ताधारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी केला. महायुतीमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले की, महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे. एकमुखी दूध उत्पादक आमच्या बाजूने राहतील अशी मला खात्री आहे. दरम्यान,…

Read More

कृषी विभागाची मोफत 'डिजिटल शेतीशाळा':शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार आधुनिक शेतीचे धडे

बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘डिजिटल शेतीशाळा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने आधुनिक शेतीचे धडे दिले जाणार आहेत. राज्यात शेतीमध्ये दिवसेंदिवस आधुनिक पद्धतीचा वापर केला…

Read More

गोरेगाव आरे मेट्रो स्टेशनजवळ बसला भीषण आग:पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अचानक आगीचा भडका, परिसरात खळबळ; VIDEO

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव आरे मेट्रो स्थानकाखाली आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग बेस्टच्या एका बसला लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे मोठे लोट आणि आगीचे भयंकर लोळ पाहायला मिळाले. मुख्य महामार्गावरच हा प्रकार घडल्याने नागरिकांचे लक्ष…

Read More