बालचित्रकारांच्या कुंचल्यातून उमटला रस्ता सुरक्षेसह जागृतीचा अनोखा संदेश:पिशोर पोलिसांच्या उपक्रमामध्ये 300 विद्यार्थ्यांचा सहभाग
पिशोर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने पिशोर पोलिस ठाण्यातर्फे वाहतूक जनजागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक शाखेच्या समन्वयाने आयोजित या उपक्रमात परिसरातील विविध शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेत इयत्ता ५ वी…