Headlines

शेतकऱ्यांना दिलासा:पैठण तालुक्यात पावसाच्या हजेरीमुळे खरीप पेरणीस वेग‎, तालुक्यात सरासरी 26.9 मि.मी. पाऊस

गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने आणि पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेने कोरड्या पडलेल्या पैठण तालुक्याला अखेर दोन दिवसांच्या समाधानकारक आणि सर्वदूर झालेल्या भिज पावसाने मोठा दिलासा दिला आहे. या दमदार हजेरीमुळे खरीप पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी वरुणराजाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला होता. दुबार पेरणीचे संकट…

Read More

weather mp gujarat monsoon UP rajasthan pre monsoon rain flood alert

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 6 राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे बुधवारी वादळामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवर खांब कोसळला. दोन गाड्यांचा मागील भाग दबला. राजस्थानमधील सीकर आणि चुरूच्या अनेक भागांत जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे दुचाकी आणि गाड्या अडकल्या. दिल्लीत…

Read More

डिकीतील 1 लाख चोरीस; 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद:वैजापूरच्या बँकेसमोरील घटना, पोलिसांकडून तपास सुरू‎

शहरातील एचडीएफसी बँकेसमोर भरदिवसा १ लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, शहरात बँक ग्राहकांना लक्ष्य करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी कांदा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने बँकेतून १४ लाख ५० हजार रुपये काढल्यानंतर ती रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवली होती….

Read More

जरंडी परिसरामध्ये ढगफुटीसदृश पाऊस‎:सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सोयगाव-बनोटी-चाळीसगाव राज्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम‎

तालुक्यातील जरंडीसह परिसरात बुधवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला. दोन तासांत कोसळलेल्या पावसामुळे गावालगत असलेल्या खडकी नदीला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पहिलाच मोठा पूर आला. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील पूल वाहून गेला. परिणामी, या मार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प झाली होती. सोयगाव-चाळीसगावचा संपर्क पूर्णपणे तुटला…

Read More

पैठणमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी‎:पर्यावरणपूरक ईव्ही बाइक रॅलीचे मुख्य आकर्षण, आतषबाजीत भगवान महेश यांची शोभायात्रा

येथे माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त धार्मिक विधी, विविध स्पर्धा, समाजभूषणांचा गौरव आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण लक्षात घेता यंदा प्रथमच काढण्यात आलेली पर्यावरणपूरक ईव्ही (इलेक्ट्रिक) बाईक रॅली हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सकाळी बालाजी मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर येथे मंत्रघोषात भगवान महेश यांच्या मूर्तीचा…

Read More

Nitin’s ‘Youth’ executive committee is focusing on the states where elections are being held, announcement is likely to be made next week

Marathi News National Nitin’s ‘Youth’ Executive Committee Is Focusing On The States Where Elections Are Being Held, Announcement Is Likely To Be Made Next Week धर्मेंद्रसिंह भदौरिया | नवी दिल्ली45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपतील सर्वात तरुण अध्यक्ष नितीन नवीन (४५) यांनी पदभार स्वीकारून ५ महिने पूर्ण झाले आहेत. यादरम्यान राष्ट्रीय संघटनेची नवीन टीम तयार करण्याची…

Read More

ढोरकीन, घाटनांद्रा, लोहगाव, पिशोर, खंडाळा परिसरात वरुणराजाची हजेरी:पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार‎

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकली आहे. ढोरकीन, घाटनांद्रा, लोहगाव आणि खंडाळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. २४ जून रोजी कुठे भिजपाऊस, कुठे रिमझिम, तर कुठे मध्यरात्री जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात सुखद गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे….

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाच केतनच्या जवळ उभी हाेती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला

पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून आले. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर सियाचा प्रियकर चेतनने रडत रडत स्वत:चे वडील बाबूलाल चौधरी यांना सांगितले की, घटना घडली…

Read More

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू:हजाराे शिक्षकांना नागपूर खंडपीठाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांचा प्रदीर्घ लढा यशस्वी ठरला आहे. न्या. अनिल पानसरे आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने रामाशंकर मिश्रा व इतर शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या याचिकांवर हा दिलासादायक निकाल दिला. दत्तात्रय बोरसे प्रकरणाचा…

Read More

समुद्राच्या तळाशी चालणारी शार्कची प्रजाती सापडली:पंतप्रधान मोदींनी ओडिशात आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे केले उद्घाटन ; 25 जूनच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदींनी ओडिशात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियमचे उद्घाटन केले क्रीडा (SPORTS) 2. फुटबॉलर रोनाल्डो 6 वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू ठरला निधन (DEATH) 3. एव्हिएटर स्टुडिओचे संस्थापक तेइमुराज उगुलवा यांचे निधन राष्ट्रीय (NATIONAL) 4. NHAI देशातील पहिले ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्स रिसर्च…

Read More