पारधी बेड्यावरील दिव्या काळेचे यश:खासदार काळे यांनी प्रत्यक्ष भेट घेत केला विद्यार्थीनीचा सत्कार
कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षणाची नवी पहाट कशी आणता येते, याचे आदर्श उदाहरण मोर्शी तालुक्यातील जामणीच्या पारधी बेड्यावर पाहायला मिळाले. येथील दिव्या रवींद्र काळे या विद्यार्थिनीने १२ वी सीबीएसई परीक्षेत ९१.२०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी थेट त्या पारधी बेड्यावर पोहोचून दिव्याचा विशेष…