विकास लवांडेंना जामीन देण्यास पोलिसांचा विरोध:तक्रारदार, साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता; वारीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
वारकरी संप्रदायाविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन देण्यास पुणे पोलिसांनी न्यायालयात विरोध केला आहे. लवांडे तक्रारदार आणि साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच आषाढी एकादशीनिमित्त आगामी वारी सोहळ्याच्या काळात अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी कारणे पोलिसांनी दिली…