Headlines

सरकार-देवाने काम केले असते तर देश बदलला असता:व्यक्ती-समाज जागृत झाल्यास देश बदलता येईल, नितीन गडकरींचे विधान

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात रोखठोक भूमिका मांडली. “सरकार आणि देवाने काम केले असते तर देश कधीचा बदलला असता,” असे ते म्हणाले. लोकांचा सरकार आणि देव या दोघांवर खूप विश्वास असतो, पण या दोघांनाही बाजूला ठेवून व्यक्ती आणि समाजाने जागृत होऊन काम केल्यास देशाला बदलता येईल, असे आवाहन त्यांनी…

Read More

परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला:देशात आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती, काँग्रेस प्रवक्ते तिवारींची केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे देशात ‘आर्थिक आणीबाणी’ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवारी यांनी म्हटले की, देशाचे अस्थिर परराष्ट्र धोरण, देशांतर्गत अशांतता, बिघडलेला सामाजिक सलोखा आणि…

Read More

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश:भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुढाकाराने मोठी कारवाई

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ या नावाने ‘१००% केस उगवण्याचे आयुर्वेदिक उपचार’ देण्याचा दावा करणाऱ्या एका बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरच्या पुढाकाराने ही धडक कारवाई करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांची संभाव्य आर्थिक फसवणूक आणि आरोग्याचा धोका टळला आहे. सोशल मीडियावर ‘सलमान भाई हेअर ट्रिटमेंट’ या नावाने मोठ्या…

Read More

पुणे जीसीसी हब बनणार:पुढील 4-5 वर्षांत शहर अत्याधुनिक ओळख निर्माण करेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

पुणे शहराची जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) म्हणून ओळख निर्माण होत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारल्या जात आहेत. पुढील चार ते पाच वर्षांत पुणे एक अत्याधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते महंमदवाडी येथे समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुंढवा…

Read More

दुभाजकाला धडकून बैतुल येथील दुचाकीस्वार ठार:नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला, मोर्शीतील तहसील कार्यालयाजवळील घटना

मोर्शी येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या मोटरसायकलस्वाराची धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात घडला. बाजीराव कुमरे (वय ३२, राहणार बैतुल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, १७ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव कुमरे हे मोर्शीजवळील दुर्गवाडा येथे…

Read More

'एल निनो'मुळे अमरावती जिल्हा परिषदेचा जलसंधारणावर भर:पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कामांचे नियोजन

अमरावती जिल्ह्यात ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत जलसंधारणाच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे,…

Read More

पर्वणी सोनोनेचा राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक:नागपूर येथील 29 व्या ‘नृत्यसंस्कृती’ स्पर्धेत अमरावतीची मान उंचावली

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या ‘नृत्यसंस्कृती’ राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अमरावतीची पर्वणी शैलेश सोनोने हिने ज्युनिअर गटातील ‘सेमीक्लासिकल’ नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघातर्फे आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत पर्वणीने शहराची मान उंचावली. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या गुणवंत स्पर्धकांमुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली होती. अशा कठीण स्पर्धेत पर्वणीने आपल्या…

Read More

अमरावतीत कोबार्क येथे कॅरिकॅचर, एआय कार्यशाळा:कला आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून कलाप्रेमींना मिळाली नवीन कौशल्ये

अमरावती येथील कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजीनियरिंग अँड रिसर्च सेंटर (कोबार्क) येथे १६ मे रोजी एक दिवसीय कॅरिकॅचर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अमरावतीतील कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कला आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधणारी ही कार्यशाळा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरली. ‘कार्टून आणि कॅरिकॅचर’ या विषयावर आधारित या कार्यशाळेत प्रख्यात कलाकार, ॲनिमेटर आणि…

Read More

माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची पक्षातर्फे गुळतुला:अमरावतीत गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटप

अमरावती येथे माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ‘गुळतुला’ करण्यात आली. या प्रसंगी गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटपही करण्यात आले. हा कार्यक्रम स्थानिक गौरक्षण येथे काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. ॲड. ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व वंचित महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप…

Read More

Dagdusheth Ganpati Trust Gets A Class Tourism Status; CM Devendra Fadnavis Announcement

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला राज्य सरकारने ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरून ही घोषणा केली, ज्यामुळे देशभरातील लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धास्थानाला नवी ओळख मि . या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि मंदिराच्या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. १८९३ मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टला १३५…

Read More