हृदयद्रावक घटना!:आई-वडिलांसह फिरायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू; कुटुंबावर शोककळा
ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी जवळील अकलोली येथे तानसा नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारच्या सुट्टीनिमित्त कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यावर काळाने झडप घातली. एकाच घरातील दोन मुलांचा अंत झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. विरार येथे वास्तव्याला असलेले रिक्षाचालक राम बच्चन चौहान हे पत्नी,…