Headlines

जळगावला सव्वा कोटींचे 5 किलो ड्रग्ज जप्त:मीरा-भाईंदरच्या पथकाचा जळगावात छापा; धडक कारवाईत 2 संशयित अटकेत

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने गुरुवारी जळगावात छापा टाकून ५ किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या ड्रग्जची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये आहे. पोलिसांनी मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. पोलिस उप निरीक्षक उमेश भागवत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहरुण परिसरातील रामनगरातून रहिम ताहेर पिंजारी (वय २८)…

Read More

वैद्यकीय प्रवेशाच्या गुणवत्ता यादीत आरक्षणावर सीईटी सेलचा डल्ला:हक्काची सवलत डावलून शेकडो विद्यार्थ्यांना टाकले थेट ‘ओपन’मध्ये!

एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान पेटवले, तर दुसरीकडे ज्यांना आधीपासूनचे घटनादत्त आरक्षण आहे, अशा विद्यार्थ्यांचे आरक्षण सीईटी सेलने परस्पर संपुष्टात आणले. सीईटी सेलने एमबीबीएस, बीडीएस या (ग्रूप-ए) वैद्यकीय प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 28 ऑगस्टला प्रसिद्ध केली. धक्कादायक म्हणजे जालन्याच्या (ता. बदनापूर) आदित्य हरी कोल्हे या विद्यार्थ्याला तात्पुरत्या गुणवत्ता यादीत ‘एनटी-सी’साठी पात्र ठरवले….

Read More

संभाजीनगरात 250 कोटींच्या 300 एकर शेतीची मालकी परस्पर काढली:म्हैसमाळ, वेरूळसारख्या पर्यटनस्थळांच्या परिसरातील शेतकऱ्यांचा मालकी हक्क असताना प्रशासनाने जमिनी परस्पर वर्ग-2 केल्या

वर्ग-2 च्या इनामी जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी शेतकरी वर्षानुवर्षे महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अगदी उलटा प्रकार केला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे असलेले म्हैसमाळ, वेरूळ आणि खुलताबादच्या 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या वर्ग-1 च्या जमिनी नोटीस न देताच परस्पर वर्ग-2 करून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे या जमिनीच्या एकरी किमती 250 कोटींपेक्षा…

Read More

कराडमध्ये अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून पोलिसांनीच केले चित्रीकरण:कारवाई न झाल्यास पीडित कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

कराड शहर पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने ३ अल्पवयीन मुलांसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजमधील किरकोळ मारामारीच्या चौकशीसाठी या मुलांना बोलावण्यात आले होते. मुलांच्या तक्रारीनुसार, रात्री खोलीचा दरवाजा बंद करून शिवीगाळ करत विवस्त्र करण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखवल्या आणि एकमेकांच्या गुप्तांगावर मारहाण करण्यास भाग पाडले. पोलिसांनी या…

Read More

नेपाळ-चीन सीमेवरील आपत्तीतून महाराष्ट्राच्या 69 पर्यटकांची सुटका:उर्वरित 193 जणांच्या परतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

नेपाळ व चीन सीमाभागात महापुराच्या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या महाराष्ट्रातील आणखी ६९ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मोठे यश आले आहे. या सर्व पर्यटकांनी चीनच्या कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून नेपाळमध्ये प्रवेश केला असून ते ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत सुखरूप परतणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट पाठपुराव्यामुळे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

प्रगतिशील शेतकरी:आंतरपिकातून निघाला खर्च, खडकाळ जमिनीवर फुलले 'डाळिंबाचे सोने'; जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचा प्रयोग, दोन वर्षांत 25 लाख उत्पन्न

शेतीमध्ये निसर्गाची अवकृपा आणि पारंपरिक पिकांमधून होणारे अनिश्चित उत्पादन यावर मात करत भोकरदन तालुक्यातील वरुड बु. येथील दादाराव गणपत वाघ यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून समृद्धीचा मार्ग शोधून काढला. केवळ दीड एकर खडकाळ जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि योग्य नियोजनाच्या बळावर त्यांनी डाळिंब बागेतून लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली. वाघ यांनी अवघ्या दीड एकर माळरानावर जालन्यातील शासकीय…

Read More

विवस्त्र करून अल्पवयीन मुलांचं चित्रिकरण:कराड शहर पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; अधिकारी, कर्मचाऱ्याविरोधात पीडिताची तक्रार

कराड शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस अंमलदार या कायद्याच्या रक्षकांनीच तीन अल्पवयीन मुलांसोबत घृणास्पद प्रकार केल्याची घटना कराड शहर पोलिस ठाण्यात घडली आहे. तीन मुलांना नग्न व्हायला लावून एकमेकांना गुप्तांगावर मारहाण करण्यास सांगितले. त्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रिकरण केल्याचा घृणास्पद प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक आणि बालकल्याण समितीकडे तक्रार करत…

Read More

गणेशोत्सवातील डीजे आणि अश्लील गाण्यांवर नियंत्रण आणा:मेधा कुलकर्णींची मागणी; गौतमी पाटीलला बोलावणे चुकीचे असल्याचे मत

गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सार्वजनिक मंडळांकडून मंडप आणि सवाद्य मिरवणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, यंदा पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नुकतेच पुणे महापालिकेच्या बैठकीत डीजेला कडाडून विरोध करणाऱ्या विद्याधर बापट या नागरिकाला बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या वादानंतर आता…

Read More

‘सिंहस्थ संस्कृती’ प्रदर्शनाचा समारोप:दुर्मीळ छायाचित्रांतून उलगडला नाशिकच्या सिंहस्थ परंपरेचा इतिहास; PHOTOS

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी जपणाऱ्या ‘सिंहस्थ संस्कृती’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नासिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी, गुरुदक्षिणा हॉल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातून नाशिकच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले. सन 1932 पासूनच्या विविध…

Read More

अरविंद सावंत यांचा सरकारवर उपरोधिक टोला:डफरीन अग्निकांड: आरोग्य सेवेतील त्रुटींवरून साधला निशाणा

डफरीन रुग्णालयातील व्हेंटीलेटर स्फोटात तीन नवजात बालकांच्या मृत्यूनंतर शिवसेना (उबाठा) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. व्हेंटीलेटरच सरकारला व्हेंटीलेटरवर आणत असल्याचा टोला त्यांनी लगावला. घटनेच्या सातव्या दिवशी त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली. सावंत यांनी या घटनेला ‘अत्यंत क्लेषदायी’ म्हटले. राज्यात यापूर्वीही असे अपघात घडले…

Read More