Headlines

चांदवडमध्ये ईद-ए-मिलाद मिरवणुकीत एकतेचा संदेश:शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे‎

ईद-ए-मिलाद सण चांदवड शहरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. मुस्लीमबहुल मोहल्ले, घरे आणि दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मस्जिद परिसरातून ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक सोमवार पेठ, शिवनेरी चौक, नाईकवाडा, पुरा, मुल्लावाडा, शिवनेरी…

Read More

श्रीकृष्णाच्या लीलांतून मोह, लोभाचा त्याग करून मानवतेने जगाचा संदेश:मानूर येथील कीर्तन सप्ताहात प्रकाश महाराज गांगुर्डे यांचे निरुपण‎

भगवान श्रीकृष्णाने विविध लीलांच्या माध्यमातून कुप्रवृत्तीचा नाश करत मानवाला संकटांना सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्याचा आणि हसत-खेळत जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे माणसाने मोह-माया व लोभापासून दूर राहून एकमेकांना सहाय्य करणारे जीवन जगावे, असा . श्रीकृष्ण भगवंताचे स्वरूप असतानाही त्यांनी जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय जीवन जगले. अखेर त्यांनाही या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे भगवंताच्या स्वरूपालाही…

Read More

सैनिकांच्या मनगटावर विद्यार्थ्यांची राखी:जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाेहाेचल्या राख्या; नांदगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम‎

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थी आणि शिक्षिकांनी स्वहस्ते सुंदर राख्या तयार करून जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाठवल्या. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सकाळीच या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा हा उपक्रम भावनिक ठरला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. ‘आपण…

Read More

निष्ठावान शिवसैनिक हाच उबाठाचा श्वास:चांदवड येथील आढावा बैठकीत माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी साधला संवाद‎

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाने चांदवड तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग देत बूथ पातळीवरील यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तळागाळातील मतदारांशी थेट संवाद वाढविण्यासाठी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बीएलए) यंत्रणा सक्षम करण्यावर आढावा बैठकीत चर्चा झाली. माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. मिर्लेकर म्हणाले की, निष्ठावान शिवसैनिक हाच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा…

Read More

थकबाकीदारांना व्यवसायाची मुभा, रक्कम भरलेल्या गाळेधारकांना ताब्याची प्रतीक्षा:घाेटी ग्रामपालिकेच्या गाळे लिलावाच्या प्रक्रियेवर स्थानिक ग्रामस्थांचा संताप‎

येथील ग्रामपालिकेच्या मटण, चिकन व मच्छी मार्केटमधील गाळ्यांच्या वाटपाचा आणि आर्थिक व्यवहाराचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. एका बाजूला लिलावाची अनामत रक्कम तसेच भाडे थकीत असतानाही तब्बल १५ गाळेधारक गाळ्यांमध्ये व्यवसाय करत असल्याचा आरोप होत आहे; तर दुसऱ . मटण, चिकन व मच्छी मार्केटमध्ये एकूण ३० गाळे असून, त्यापैकी १५ गाळेधारकांकडून लिलावाची अनामत रक्कम भरलेली…

Read More

समृद्धी महामार्गावर 16 तासांनंतर गॅस गळती रोखण्यात मिळाले यश:वाहतूक 5 तास बंद, माळीवाडा- हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून वळवली‎

गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी शिवारातील समृद्धी महामार्गालगत गट क्रमांक ८६ मध्ये शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. एमएनजेपीएल या नैसर्गिक गॅस पाइपलाइनच्या मुख्य व्हॉल्व्ह पॉईंटवरील कपलिंग निघाल्यामुळे भीषण गॅस गळती सुरू झाली होती. विविध यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करत तब्बल १६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी सकाळी १० वाजता ही गळती रोखण्यात यश मिळवले आहे. रविवारी…

Read More

30 किमीत पंधरा ठिकाणी महामार्गाचे‎ दुभाजक फोडत बनवले अनधिकृत रस्ते‎:धुळे-सोलापूर महामार्गावर गल्लेबोरगाव ते कन्नड घाटादरम्यान महिनाभरात 5 मृत्यू‎

देशाच्या मध्य भागातील पाच राज्यांना आणि महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ४६१ किमी लांबीचा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. कन्नड हद्दीत या महामार्गावर १५ ठिकाणी दुभाजक फोडून रस्ते के ले आहे . छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या १२४ किमी महामार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी दुभाजक तोडून अनधिकृत रस्ते तयार केले आहेत. दुभाजकामधील झाडांमुळे…

Read More

चापानेर प्रकल्पासह नदी-नाले कोरडेच,‎शेतकऱ्यांचे लोखंड्या नक्षत्राकडे लक्ष‎:यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून जाण्याची बळीराजाला भीती

Marathi News Local Maharashtra Aurangabad Rivers And Streams Dry Up Along With The Chapaner Project, Farmers Are Focusing On The Lokhandya Constellation, Baliraja Fears That This Year’s Kharif Season Will Be Completely Out Of His Hands चापानेर1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक पावसाळ्याचे तब्बल तीन महिने उलटून गेले तरी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने चापानेरसह परिसर दुष्काळी छायेखाली…

Read More

लेकींच्या हाती बैलांची वेसण, बैलगाडा शर्यतीतील नव्या चॅम्पियन महिला:महाराष्ट्रात दरवर्षी 1000 हून अधिक बैलगाडा शर्यती, 2 हजार कोटींची उलाढाल

राज्यातील बैलगाडा शर्यत आता केवळ पुरुषांचे मैदान राहिलेले नाही. या खेळाच्या नव्या चॅम्पियन महिला आहेत. त्या केवळ बैलांवर पैज लावत नाहीत, तर त्यांना प्रशिक्षित करतात. देखभालही करतात आणि स्वतः बैलांची वेसण हाती घेऊन शर्यतीतही उतरत आहेत. . मुंबई, ठाणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव… राज्यभरातील पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यतीत मुली आणि महिलांची संख्या वाढत आहे. काहींचे…

Read More

जरांगेंच्या विरोधानंतरही परभणीत मेळावा, मुंबईला जाणारच- जरांगेंचा इशारा:इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- उपमुख्यमंत्री शिंदे

मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत टिकणारे असावे, ही सरकारची भूमिका आहे. घाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. मराठा आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी येथील मेळाव्यात दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या तीव्र विरोधानंतरही परभणीत शिवसेनेच्या युवा संवाद…

Read More