Headlines

अखेर केडगावातील उघड्या डीपीला महावितरणने बसवली सुरक्षा जाळी:शाहूनगर बाजारातील धोकादायक डीपीभोवती उपाययोजना‎

केडगाव येथील शाहूनगर भाजीबाजार परिसरातील पाच गोडाऊनच्या कंपाऊंड वॉललगत असलेल्या धोकादायक विद्युत वितरण रोहित्राची (डीपी) अखेर महावितरणने दखल घेतली. डीपीचा दरवाजा तुटल्याने अनेक दिवसांपासून रोहित्र उघड्यावर होते. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या धोकादायक डीपीमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करताच महावितरणने हालचाली करत डीपीभोवती सुरक्षा जाळी बसविली. शाहूनगर भाजीबाजारात सकाळपासून…

Read More

सिव्हिल हडकोत ‘कॅमेऱ्याची नजर’, ‘उपरोधिक टोमणे’ही ठरताहेत व्यर्थ:सूचना फलकाखालीच कचऱ्याचा ढीग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सावेडी उपनगरातील उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या सिव्हिल हडको परिसरात कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासन एकीकडे स्वच्छता मोहिमेचे दावे करत असताना, दुसरीकडे नागरिक स्वतःच आरोग्याशी . सिव्हिल हडकोतील रहिवासी वस्तीमध्ये एका मोकळ्या जागेवर ‘येथे कचरा टाकू नये’ असा स्पष्ट सूचनाफलक लावण्यात आला आहे. परिसरात ‘सीसीटीव्ही यंत्रणा’ बसवण्यात…

Read More

पैठण शहरात 100 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात:सीटीस्कॅनपासून अतिदक्षता कक्षापर्यंत अत्याधुनिक सुविधा‎

तब्बल तीन दशकांपासून कागदोपत्री अडकलेले पैठण येथील १०० खाटांच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न आता अखेर प्रत्यक्षात उतरत आहे. शहरासह संपूर्ण तालुक्यातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा मुख्य आधार ठरणार्या या महत्त्वाकांक्षी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून या प्रकल्पासाठी ४३ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून,…

Read More

Jharkhand Prisoners Work Policy; HDFC CEO Shashidhar Jagdishan Resignation

23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान 30 ऑगस्ट रोजी उझबेकिस्तानने पंतप्रधान मोदींना देशाचा सर्वोच्च राज्य सन्मान ‘ओली दाराजली दोस्लिक’ प्रदान केला. उझबेक भाषेतील या शब्दाचा अर्थ आहे- उच्च स्तरावरील मैत्री. पंतप्रधान मोदींना हा सन्मान उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत…

Read More

आठ महिन्यांनंतर पैठण नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदाची होणार निवड

पैठण नगर परिषदेत गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष विद्या कावसानकर आणि मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. पैठण नगर…

Read More

हिंगोली-औंढा मार्गावर भीषण अपघात:बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू; पोलिस दलावर शोककळा

हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवरा शिवारात दुचाकी व ट्रक अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 30 मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. मुरलीधर जाधव (50) असे मयत कर्मचाऱ्याचे नांव असून बंदोबस्त आटोपून ते बासंबा कडे निघाले असतांना हा अपघात झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालु्क्यातील…

Read More

गायिका मैथिली ठाकूर यांचा संवाद:म्हणाल्या- यशाचे शिखर गाठण्यासाठी मुलींना वडिलांची भक्कम साथ महत्त्वाची

मुलीने कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करून यशाचे शिखर गाठायचे असेल, तर तिच्या पाठीशी वडिलांची भक्कम साथ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा विश्वास असेल तर मुलगी आकाशालाही गवसणी घालू शकते, असा विश्वास लोकगायिका तथा आमदार मैथिली ठाकूर यांनी व्यक्त केला. तरुणींचे यश, महिला सुरक्षितता, राजकारण-गायनाचा समतोल आणि तरुणाईचा आध्यात्माकडे वाढता कल यावर ‘दिव्य मराठी’शी त्यांनी…

Read More

इथेनॉल ब्लेंडिंगवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी:याचिकेत मागणी – पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळले जात आहे हे पेट्रोल पंपांवर सांगावे

सर्वोच्च न्यायालय आज म्हणजेच सोमवार (31 ऑगस्ट) रोजी त्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहे, ज्यात देशातील सर्व पेट्रोल पंपांच्या नोजलवर आणि पेट्रोल बिलावर इथेनॉलची नेमकी मात्रा म्हणजेच टक्केवारी लिहिण्याची मागणी करण्यात आली आहे. पीटीआय (PTI) नुसार, न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. ही याचिका नरेंद्र कुमार गोस्वामी…

Read More

सेंद्रिय, नैसर्गिक पद्धतीने शेती करा:मेंढोळदे येथे केळी पिकाची शेतीशाळा; शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोळदे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ अंतर्गत रविवारी केळी पिकाची विशेष शेतीशाळा पार पडली. या प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने केळीची शेती करण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेला गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुक्ताईनगर येथील कृषी तंत्र विद्यालयाचे पंकज…

Read More

वेरूळला दोन दिवसांमध्ये 83 हजार भाविकांनी घेतले श्री घृष्णेश्वराचे दर्शन:तीर्थकुंडावरून पायी जात पिनाकेश्वर महादेवाला जलाभिषेक‎

शनिवार-रविवार लागून आलेल्या शासकीय सुट्ट्या आणि श्रावणातील तिसरा सोमवार यांच्या सुरेख योगायोगामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वेरूळ येथे भाविकांचा अथांग महासागर लोटल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांत सुमारे ८३ हजारांहून अधिक शिवभक्तांनी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन धन्यता मानली, तर लाखो भाविकांनी पवित्र तीर्थकुंडावरून पायी जात पिनाकेश्वर महादेवाला जलाभिषेक केला. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि…

Read More